नववर्षानिमित्त श्रीरामभक्तीचा जागर

31 Dec 2025 18:26:28
नागपूर,
Ram Bhakti Jagar प्रतिष्ठाद्वादशीचे औचित्य साधून नववर्षानिमित्त नागपुरातील १३ श्रीराम मंदिरांमध्ये श्रीरामभक्तीचा जागर आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमाचा समारोप गुरुवार, १ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी ७ वाजता रामनगर येथील श्रीराम मंदिरात होणार आहे.
 

sita  
 
 
या कार्यक्रमाअंतर्गत प्रत्येक मंदिरात सुमारे २० मिनिटांचा धार्मिक कार्यक्रम होणार असून श्रीराम मूर्तीला पुष्पहार अर्पण, सामूहिक श्रीरामरक्षा व मारुती स्तोत्र पठण, मान्यवरांच्या हस्ते महाआरती व प्रसाद वितरण करण्यात येणार आहे.Ram Bhakti Jagar या भक्तिमय सोहळ्यात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
सौजन्य:रवि वाघमारे,संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0