नवी दिल्ली,
rohit-and-virat-18-odi-matches-in-2026 भारतीय क्रिकेटमधील दोन दिग्गज फलंदाज विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी कसोटी तसेच टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारल्यानंतर आता हे दोघे केवळ एकदिवसीय क्रिकेटमध्येच खेळताना दिसणार आहेत. रोहित आणि विराटला प्रत्यक्ष मैदानावर पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये नेहमीच प्रचंड उत्सुकता असते. त्यामुळे २०२६ या वर्षात भारत किती वनडे सामने खेळणार आणि त्या सामन्यांत हे दोन्ही स्टार खेळाडू किती वेळा मैदानात उतरतील, याबाबत क्रिकेटप्रेमींमध्ये मोठी चर्चा सुरू आहे.
२०२६ साठी भारतीय क्रिकेट संघाचे अधिकृत वेळापत्रक जाहीर झाले असून, आगामी वर्षातही टीम इंडिया अत्यंत व्यस्त राहणार आहे. rohit-and-virat-18-odi-matches-in-2026 सध्या जाहीर करण्यात आलेल्या कार्यक्रमानुसार भारताला २०२६ मध्ये एकूण १८ एकदिवसीय सामने खेळायचे आहेत. जर या कालावधीत रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना विश्रांती देण्यात आली नाही किंवा दुखापतीचा अडथळा आला नाही, तर हे दोघेही सर्व १८ सामन्यांत खेळताना दिसण्याची शक्यता आहे.
नववर्षाच्या सुरुवातीलाच भारत न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानावर वनडे मालिका खेळणार आहे. जानेवारी २०२६ मध्ये होणाऱ्या या मालिकेत तीन सामने असतील. rohit-and-virat-18-odi-matches-in-2026 पहिला सामना ११ जानेवारी रोजी वडोदरा येथे, दुसरा १४ जानेवारी रोजी राजकोटमध्ये आणि तिसरा सामना १८ जानेवारी रोजी इंदूर येथे खेळवला जाणार आहे. त्यानंतर जून २०२६ मध्ये अफगाणिस्तानचा भारत दौरा होणार असून या दौऱ्यात तीन वनडे सामने खेळवले जाणार आहेत, मात्र त्यांच्या तारखा अद्याप निश्चित झालेल्या नाहीत.
जुलै २०२६ मध्ये भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार असून तिथेही तीन एकदिवसीय सामने होतील. हे सामने अनुक्रमे बर्मिंगहॅम, कार्डिफ आणि लंडन येथे खेळवले जाणार आहेत. rohit-and-virat-18-odi-matches-in-2026 सप्टेंबर महिन्यात वेस्ट इंडिजचा भारत दौरा नियोजित असून या मालिकेतही तीन वनडे सामने होणार आहेत. त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२६ दरम्यान भारत न्यूझीलंडच्या दौऱ्यावर जाणार असून तिथे तीन एकदिवसीय सामने खेळवले जातील. वर्षाच्या शेवटी, डिसेंबर २०२६ मध्ये श्रीलंकेचा भारत दौरा होणार असून त्या मालिकेतही तीन वनडे सामने निश्चित आहेत.
दरम्यान, ११ जानेवारीपासून सुरू होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी विराट कोहली आणि रोहित शर्मा पूर्णपणे सज्ज असल्याचे दिसत आहे. rohit-and-virat-18-odi-matches-in-2026 या दोघांनी विजय हजारे ट्रॉफीतही सहभाग घेतला असून सध्या ते जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. विराट कोहलीने आपल्या मागील सहा डावांमध्ये तीन शतके आणि तीन अर्धशतके झळकावली आहेत, तर रोहित शर्माने ऑस्ट्रेलियामधील शतकी खेळी, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अर्धशतक आणि विजय हजारे ट्रॉफीतील शानदार शतकासह आपली उत्कृष्ट फॉर्म कायम राखली आहे. त्यामुळे २०२६ मधील वनडे हंगामात ‘रो-को’ जोडीकडून मोठ्या खेळींची अपेक्षा क्रिकेटप्रेमींना आहे.