निरंतरता ही निरामय आयुष्याची गुरुकिल्ली – डॉ. अमित सालकर

31 Dec 2025 18:31:38
नागपूर,
Senior Citizens Corporation आरोग्य नियमांमध्ये सातत्य ठेवल्यास निरोगी व दीर्घायुष्य लाभते, असे प्रतिपादन प्रख्यात हृदयविकार तज्ज्ञ डॉ. अमित सालकर यांनी केले. ज्येष्ठ नागरिक महामंडळ विदर्भ व ज्येष्ठ नागरिक मंडळ, हनुमाननगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “हृदयविकार उपचार व बचाव” कार्यक्रमात ते बोलत होते. रोज चालण्याची सवय, नियमित व्यायाम व वैद्यकीय सल्ल्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.यावेळी महामंडळाच्या कार्याध्यक्षा ॲड. स्मिता देशपांडे यांच्या नागपूर बार असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी निवडीबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास प्रभुजी देशपांडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
 
nira
 
 
 
कार्यक्रमात दरमहा २७ तारखेला होणाऱ्या उपक्रमाअंतर्गत त्या महिन्यात जन्मदिवस असलेल्या सभासदांचा वाढदिवस व सत्कार करण्यात आला. यावेळी महामंडळाच्या कार्याध्यक्षा ॲड. स्मिता देशपांडे यांची नागपूर बार असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. Senior Citizens Corporation तसेच विनोद तुंगार, निशिकांत लघाटे, विजय शेंडे, नीलकंठ भोयर, हरिश्चंद्र बावनकुळे, श्याम पातूरकर, ब्रजराज कपाटे, वासुदेव नरड, ॲड. राजेश लाख आदींचाही सत्कार करण्यात आला. ॲड. राजेश लाख यांनी स्वतंत्रपणे ॲड. स्मिता देशपांडे यांचा गौरव केला.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अशोक बांडणे, प्रकाश मिरकुटे, राजाभाऊ अंबारे, सुधीर पौनिकर, रामदास ठवकर, उल्हास शिंदे आदी सदस्यांनी परिश्रम घेतले.
 
सौजन्य:विनोद व्यवहारे,संपर्क मित्र
 
Powered By Sangraha 9.0