पोलिस अधीक्षक साहेब, पारवा परिसरातील नागरिकांना न्याय द्या हो..!

31 Dec 2025 20:18:44
राम जिल्लडवार
पारवा, 
parwa-police-station : यवतमाळ जिल्ह्यातील केळापूर-आर्णी विधानसभा क्षेत्रातील घाटंजी तालुक्यातील आदिवासीबहुल क्षेत्र संबोधल्या जाणाèया व संवेदनशील पारवा परिसर आहे. परिसरातील 102 गावांच्या सुरक्षेचा भार पारवा पोलिस ठाण्यावरच आहे. मात्र कर्मचारी अपुरे असल्यामुळे पोलिसांची तारांबळ उडते.
 
 
 
police
 
 
त्यातच या भागातील मुख्य म्हणजे या भागातील पैनगंगा धरण. हे या भागात अत्यंत महत्त्वाचे कार्य होत आहे. मात्र धरणग्रस्त समितीचे सध्या सावळी व लगतच्या परिसरातील नागरिकांनी धरण होऊ नये म्हणून अनेकदा आंदोलने केली आहेत. काही आंदोलने आक्रमक झाली होती. त्याचा ताण पारवा पोलिसांवर पडला होता. या धरणाचे काम जलदगतीने निर्माण करण्याची तयारी सुरू आहे. त्यामुळे संवेदनशील असलेल्या या कामाचा ताणही पोलिसांवर आहे.
 
 
तसेच तेलंगण राज्य जवळच असून या भागातून अवैध वाहतूक व गोवंश तस्करीसह इतरही तस्करी या भागातून वाढल्याची परिसरात चर्चा सुरू आहे. तेव्हा यावरसुद्धा अतिशय गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. टिपेश्वर अभयारण्य हा अत्यंत महत्वाचा भाग या पोलिस ठाण्यांतर्गत येतो. मराठवाडा विभागसुद्धा येथून जवळच येतो.
 
 
सामान्य माणसाच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी पोलिसांकडे येतात. त्यामुळे काही तक्रारींकडे दुर्लक्ष होत असल्याने ‘साहेब, पारवा परिसरातील नागरिकांना दिलासा व न्याय देण्याकडे लक्ष द्या हो’ अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत.
Powered By Sangraha 9.0