नागपूरकरांनो सावध राहा! 'Thirty First'ला तुमच्या मागे असणार 3500 पाेलिस

31 Dec 2025 14:18:44
अनिल कांबळे
नागपूर,
Thirty-First :  ‘थर्टी फस्ट’च्या स्वागतासाठी तरुणाई सज्ज झाली असून अनेक ठिकाणी माेठमाेठ्या पार्ट्या, गेट-टुगेदर आणि ‘मीट-अप’ चे आयाेजन करण्यात आले आहे. परंतु, शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी साडेतीन हजार पाेलिसांचा ताा रस्त्यावर सज्ज असणार आहे. त्यामुळे दारु पिऊन गाेंधळ घातल्यास रात्र पाेलिस काेठडीत जाण्याची शक्यता आहे.
 
 
31st ngp
 
 
 
31 डिसेंबरच्या संध्याकाळपासून शहरातील हाॅटेल, बार, रेस्टाॅरंट, पिकनिक स्पाॅट, उद्याने तसेच प्रमुख चाैक-चाैरस्त्यांवर माेठ्या प्रमाणात नागरिक व युवकांची गर्दी हाेते. ही गर्दी लक्षात घेता यंदा नागपूर पाेलिसांनी अत्यंत कडक आणि सुनियाेजित बंदाेबस्त आखला आहे. 31 डिसेंबरची संध्याकाळ हाेताच शहरातील रस्त्यांवर पाेलिसांचा कडेकाेट बंदाेबस्त ठेवण्यात येईल. नववर्ष बंदाेबस्तासाठी साडेतीन हजारांहून अधिक पाेलीस अधिकारी व कर्मचारी तैनात राहणार आहेत. यामध्ये 10 पाेलिस उपायुक्त, 15 सहायक पाेलिस आयुक्त आणि 40 वरिष्ठ पाेलिस निरीक्षक स्वतः रस्त्यावर उतरून बंदाेबस्त हाताळणार आहेत.
 
 
100 पेक्षा जास्त ठिकाणी नाकाबंदी
 
 
नववर्षाच्या रात्री शहरातील 100 हून अधिक ठिकाणी नाकाबंदी करण्यात येणार आहे. वाहतूक पाेलिस आणि स्थानिक पाेलिस संयुक्तपणे दुचाकी, चारचाकी तसेच संशयित वाहनांची तपासणी करणार आहेत. ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’विराेधात विशेष माेहीम राबवली जाणार असून मद्यपान करून वाहन चालवणाèयांवर कठाेर कारवाई केली जाईल. फुटाळा तलाव, अंबाझरी तलाव परिसर, संविधान चाैक, इतर पिकनिक स्पाॅट आणि गर्दीच्या ठिकाणी साद्या वेशातील पाेलिस कर्मचारी तैनात असतील.
 

Navinchandra-Reddi 
  
हाॅटेल, बार, रेस्टाॅरंट तसेच नववर्ष स्वागत समारंभाच्या ठिकाणीही पाेलिसांचे विशेष लक्ष राहणार आहे. रस्त्यावर फटाके ाेडणे, बेकायदेशीर आतषबाजी किंवा नियमांचे उल्लंघन करणाèयांवर तत्काळ कारवाई केली जाईल.‘‘जल्लाेष साजरा करताना खबरदारी घ्या आणि इतरांना त्रास हाेऊ नये म्हणून काळजी घ्या.
- नवीनचंद्र रेड्डी (सहपाेलिस आयुक्त)
Powered By Sangraha 9.0