वर्धा,
wardha-grand-rangoli : वर्धेतील साई बाबा मंदिरात इंग्रजी नववर्षाच्या स्वागताला साई मंदिर आणि रमण आर्ट्सच्या वतीने भव्य रांगोळी साकारल्या जाते. यावर्षी अन्न वाचवा असा संदेश देणारी अन्नपूर्ण मातेची भव्य रांगोळी साकरण्यात आली आहे. २०० किलो रांगोळीतून २५ बाय २५ आकाराची रांगोळी १३ कलाकारांच्या परिश्रमानंतर ११ तासांमध्ये ही रांगोळी पूर्ण झाली.
वृषाली हिवसे यांच्या नेतृत्वात गौरव डेहणकर, अक्षय सोमनकर, अमोल हिवसे, चित्रा चवरे, शुभांगी पोहाणे, आचल पुणेवार, प्रज्वल हिवरे, सारिका काळे, चंद्रकांत सहारे, लोकेश भुरसे, अमोल चवरे, दिनेश राऊत यांनी परिश्रम घेतले. विशेष म्हणजे, रांगोळीचा अर्थ स्पष्ट करणारी अन्नपूर्णा आणि भगवान शंकराची कथा ही बाजूला लिहिली आहे. ३१ डिसेंबर निमित्त साईभतांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे. ही रांगोळी अजून दोन दिवस राहणार असल्याने जास्तीस्त जास्त लोकांनी साईदर्शनाचा लाभ घेऊन रांगोळी कलाकारांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन साई मंदिरचे सचिव सुभाष राठी यांनी केले आहे.