हिंगणघाट,
ramlalla-pranprasthyapana : श्रीरामजन्मभूमी अयोध्या येथे प्रभू श्रीरामलला प्राणप्रतिष्ठापणेचा ऐतिहासिक सोहळा झाला. आज बुधवार ३१ डिसेंबर रोजी येथील प्रसिद्ध श्रीराम मंदिरात महाआरतीचे आयोजन विश्व हिंदू परिषद हिंगणघाटच्या वतीने करण्यात आले होते.
प्रभू श्रीराम हे मर्यादा, धर्म, त्याग आणि राष्ट्रभावनेचे आदर्श असून त्यांच्या मंदिराच्या स्थापनेचा प्रत्येक क्षण इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरला गेला आहे. या मंगल दिनानिमित्त विहिंपच्या वतीने रामभतांना शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी हनुमान चालीसा, श्रीरामरक्षा पठण करून महाआरती करण्यात आली. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल तर्फे प्रसादाचे वाटप करण्यात आले.
यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघचालक जेठानंद राजपूत, विश्व हिंदू परिषद वर्धा जिल्हा सहमंत्री शरद कोणप्रतिवार, विहिंप वर्धा जिल्हा धर्म प्रसार प्रमुख अजय भोंग, विहिंप वर्धा जिल्हा विमर्ष प्रमुख सचिन धारकर, देवा वाघमारे, गजानन मसाये, वर्धा जिल्हा मातृशती सह संयोजिका विद्या पेंडके, रवींद्र खंडाळकर, सुरेश बुराडकर, हिंगणघाट प्रखंड बजरंग दल संयोजक दीपक शर्मा, रोशन चंदनखेडे, आशिष झिलपे, प्रीती जोशी, ज्योती वाघमारे, जीवेश मुंगले, पियुष मुनिश्वर, विहिंप, बजरंग दल, मातृशती आणि असंख्य भाविक सहभागी झाले होते.