राज्यस्तर स्पर्धेत यवतमाळ जिल्ह्याला 53 पदके

31 Dec 2025 19:33:54
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, 
yavatmal-news : 46 व्या राज्यस्तरीय महाराष्ट्र मास्टर्स अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद चाम्पियनशिप 2025 वाशिम स्पर्धेत यवतमाळ जिल्ह्याला 31 सुवर्ण, 15 रजत तर 7 कांस्य अशी 53 पदके प्राप्त झाली आहेत. महाराष्ट्र मास्टर्स अ‍ॅथलेटिक्स असोशिएशनद्वारा जिल्हा क्रीडा स्टेडीयम वाशिम येथे शुक्रवार, 26, 27 व 28 डिसेंबर रोजी आयोजित 46 व्या राज्यस्तर महाराष्ट्र मास्टर्स अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद चॅम्पियनशिप-2025 वाशिम स्पर्धेत मास्टर्स अ‍ॅथलेटिक्स स्पोर्ट अ‍ॅन्ड वेल्फेअर असोशिएशन यवतमाळच्यावतीने 35 ते 85 वयोगटातील 22 पुरुष व 10 महिलांनी सहभाग घेतला. यात यवतमाळ जिल्ह्याने 53 पदके कमावीत भरीव कामगिरी केली.
 
 
 
jk
 
 
 
माजी आमदार विजय जाधव, राज्य क्रीडा उपसंचालक प्रा. अनिल बोंडे, उपअभियंता मनोज बोंडे, अतुल पाटील यांच्या हस्ते विजेत्यांना पदक, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह प्रदान करून सन्मानित करण्यात आले. यात ज्योती वरघणे यांना सुवर्ण, हेमलता वैद्य यांना रजत व सुवर्ण, मेघा चौकसकर यांना रजत, वंदना कवरासे यांना सुवर्ण व कांस्य, शुभांगी संजय पजगाडे सुवर्ण व रजत, सुनिता लाकडे सुवर्ण व कांस्य, मृणालिनी वंजारी सुवर्ण, शुभांगी गुल्हाने सुवर्ण व रजतपदक प्राप्त झाले.  
 
 
पुरुषांमध्ये शंकर कहारे सुवर्ण व रजत, तुळशीराम खामनकर कांस्य, यशवंत ईसराणी सुवर्ण व रजत, साहेबराव राठोड सुवर्ण, डॉ. प्रदीप गिरी सुवर्ण, पांडूरंग कवरासे सुवर्ण व रजत, देवराव फटिंग सुवर्ण, रजत व कांस्य, अजय पोतदार सुवर्ण व रजत, सूत्रसेन भितकर सुवर्ण, सतीश मुडे रजत व कांस्य, अशोक सव्वासे सुवर्ण, विजय वाघ रजत, सचिन गणथडे सुवर्ण व कांस्यपदक पटकावले.
या स्पर्धेत शीला पेडणेकर, अनुराधा तांबेकर, एकनाथ खवडे, गुलाब भोळे, नरेंद्र भांडारकर, शिवहर जवणे, संजय पजगाडे, युवराज राठोड, गजानन पवार, नितीन चांदेकरही सहभाग झाले होते.
 
 
या स्पर्धेत पदकप्राप्त खेळाडूंची 28 ते 31 जानेवारी व 1 फेब्रुवारी रोजी चंद्रशेखर नायर व युनिवर्सिटी स्टेडियम त्रिवेंद्रम (केरळ) येथे होणाèया 46 व्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड करण्यात आली. त्यांना महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळणार आहे.
 
 
जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड, महाराष्ट्र मास्टर्स अ‍ॅथलेटिक्स असोशिएशन मुंबईचे अध्यक्ष चंद्रकांत तराळ, सचिव डोमॅनिक सेव्हियो, मास्टर्स अ‍ॅथलेटिक्स स्पोर्ट अ‍ॅन्ड वेलफेअर असोशिएशन यवतमाळ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गुलाब भोळे, कार्याध्यक्ष देवेंद्र चांदेकर, उपाध्यक्ष देवानंद तांडेकर, सचिव नरेंद्र भांडारकर, कोषाध्यक्ष शीला पेडणेकर, सदस्य शीतल दरेकर, अनुराधा तांबेकर यांनी कौतुक केले.
Powered By Sangraha 9.0