कर्नाटकमध्ये ११४३ किलो चंदनाची लाकूड जप्त, ३ वाहनही ताब्यात

04 Dec 2025 16:30:49
बंगळुरू, 
sandalwood-seized-in-karnataka कर्नाटकची राजधानी बंगळुरू येथील पोलिसांनी आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि कर्नाटकमध्ये कार्यरत असलेल्या आंतरराज्यीय लाल चंदनाच्या लाकडाच्या तस्करीच्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी एकूण १,१४३ किलो लाल चंदनाचे लाकूड आणि तीन आलिशान वाहने जप्त केली आहेत, ज्यांची किंमत अंदाजे १ कोटी रुपये आहे. एका संशयिताला अटक करण्यात आली आहे, तर उर्वरित साथीदार फरार आहेत. वृत्तानुसार, संपूर्ण कारवाई इलेक्ट्रॉनिक सिटी डिव्हिजनचे डीसीपी एम. नारायण (आयपीएस) यांच्या देखरेखीखाली करण्यात आली. एसीपी के.एम. सतीश यांनी या कारवाईचे पर्यवेक्षण केले, तर हुलीमावू पोलिस स्टेशनचे अधिकारी बी.जी. कुमारस्वामी आणि त्यांच्या पथकाने छापा टाकला.
 
sandalwood-seized-in-karnataka
 
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, ७ नोव्हेंबर रोजी भाटमीधर नावाच्या एका व्यक्तीने हुलीमावू पोलिस स्टेशनला तक्रार केली की बनरघट्टा मुख्य रस्त्यावर गोट्टीगेरे तलावाजवळ एक कार बेकायदेशीरपणे पार्क केलेली आहे. तक्रार मिळताच, पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले, त्यांनी घटनास्थळावर छापा टाकला आणि एका व्यक्तीला ताब्यात घेतले. sandalwood-seized-in-karnataka चौकशीदरम्यान, आरोपीने बेकायदेशीरपणे लाल चंदनाची विक्री केल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून ९५ किलो लाल चंदन आणि एक कार जप्त केली. त्यानंतर वन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला ८ नोव्हेंबर रोजी न्यायालयात हजर करण्यात आले, जिथे त्याला २० दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
दीर्घ चौकशीदरम्यान, आरोपीने उघड केले की त्याने आणि त्याच्या साथीदारांनी आंध्र प्रदेशातील कडप्पा जिल्ह्यातून स्वस्त दरात लाल चंदन खरेदी केले आणि ते तामिळनाडू आणि कर्नाटकमध्ये जास्त किमतीत विकले. sandalwood-seized-in-karnataka त्याने पुरवठादारांची नावे आणि पत्ते देखील दिले. आरोपीच्या माहितीनंतर, पोलिसांनी अनेक ठिकाणी छापे टाकले, एकूण १,१४३ किलो लाल चंदन आणि तीन वाहने जप्त केली. २६ नोव्हेंबर रोजी, आरोपीला पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले आणि न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्याच्या फरार साथीदारांचा शोध सुरू आहे आणि तपास सुरू आहे.
Powered By Sangraha 9.0