शेतकर्‍यांसह मजुरांचा नदीपात्रातून जीवघेणा प्रवास

04 Dec 2025 19:15:58
चिमूर,
 
chandrapur-life-river चिमूर-वरोडा राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या उमा नदीच्या पात्रातून शहरातील पन्नासवर शेतकरी, शेतमजूर दहा किलोमीटरचा फेरा टाळण्याकरिता टीन तथा दोरीच्या जुगाडाने तयार केलेल्या नावेतून जीवघेणा प्रवास करीत आहेत. नदीचे पाणी कमी झाल्यावर रपटा बांधून देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, हे आश्वासनही हवेत विरले. शहरात शुद्ध पेयजलाकरिता उमा नदीवर बंधारा बांधून जलशुद्धीकरण केंद्र तयार करण्यात आले. बंधार्‍यामुळे नदी पात्रात पाण्याचा संचय वाढला.
 
 
 
chandrapur-life-river
 
 
chandrapur-life-river यामुळे पन्नास शेतकर्‍यांना माणुसमारी, चिचाळा रिठ या जंगल क्षेत्रालगतच्या परिसरातून जवळपास दहा किलोमिटर अंतर शेती कामाकरिता पार करावे लागते. बंधार्‍यातील पाणी कमी झाल्यानंतर उथळ पात्र असल्याने कामाकरिता नदीतूनच शेतात जायचे. मात्र, या शेतकर्‍यांच्या मार्गावरील नदी पात्रातून वाळू तस्करांकडून वाळूचा उपसा करण्यात आल्याने दीड माणसावर पात्रात खोल खड्डे झाले आहेत. यामुळे जीव धोक्यात घेऊन नदीपात्र पार करणे जिकरीचे झाले. ही समस्या शेतकर्‍यांनी आ.किर्ती भांगडिया यांना सांगितली. नदीचे पाणी कमी झाल्यानंतर रपटा बांधून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. पण अद्याप रपटा झाला नाही.
 
 
 
chandrapur-life-river रपट्याच्या कामाला असलेला वेळ पाहता शेतीची कामे खोळंबू नये याकरिता युवा शेतकरी प्रवीण चौखे याने सहकार्‍याच्या मदतीने नाव तयार केली आहे. ही नाव थर्माकोल, टीनाच्या मदतीने तयार करण्यात आली आहे. याच नावेतून शेतकर्‍यांचा प्रवास सुरू आहे. असे असले तरी अपघाताचा धोका आहेच.
 
देशी जुगाड करून नाव केली तयार : प्रवीण चौखे chandrapur-life-river
बंधार्‍यामुळे नदी पात्रात पाणी वाढले आहे. तरीही आम्ही पूर्ण शेती हंगामात याच नदीपात्रातून शेतात जात होतो. मात्र, वाळूतस्करांनी उपसा करून खड्डे केल्याने चिंता वाढली. देशी जुगाड करून आम्ही नाव तयार केली आहे. यातूनच आम्ही शेतात जाणे-येणे करतो, अशी प्रतिक्रिया शेतकरी प्रवीण चौखे यांनी दिली.
Powered By Sangraha 9.0