गडचिरोली,
Forest produce training, ग्रामसभांनी वनोपज संकलन, प्रक्रिया व विक्री व्यवस्थापनाचे धडे घेऊन ग्रामसभांचे सक्षमीकरण करावे, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते डॉ. देवाजी तोफा यांनी केले.
खुणारा येथील पारंपरिक गोटुलभूमीवर 1 डिसेंबर रोजी कन्वर्जन समिती तालुका कोरची, कन्वर्जन समिती जिल्हा गडचिरोली, वनहक्क प्राप्त ग्रामसभांचे महासंघ तालुका कोरची तथा वनहक्क प्राप्त जिल्हा महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने विचारमंथन व मार्गदर्शन कार्यक्रम पार पडला. यावेळी मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. यावेळी अध्यक्ष म्हणून अकरा गाव ईलाखा भूमिया फुलसिंग मडावी होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा महासंघाचे सचिव नितीन पदा, जिल्हा महासंघाचे संघटक शिवाजी नरोटे, डॉ. कोडापे, रविंद्र कोवे महाराज, डॉ. सतीश गोगुलवार, केशव गुरनुले, कुमारीताई जमकातन, सियाराम हलामी यासह कुरखेडा, आरमोरी, धानोरा, एटापल्ली, चामोर्शी, देसाईगंज, गडचिरोली तालुक्याच्या ग्रामसभांचे पदाधिकारी हजर होते.
तनहक्क कायदा 2006 अंतर्गत वयक्तिक व सामूहिक हक्कमध्ये संरक्षण, व्यवस्थापन व पुनर्निर्माण संदर्भात संवाद, पेसा कायदा 1996 मधील ग्रामसभांचे अधिकार व पारंपरिक अधिकार व सीमांची माहिती, गौणवनोपज संकलन आदीबाबत मार्गदर्शन करण्यात आले.यावेळी नितीजी पदा यांनी जिल्हा महासंघाची भूमिका, कर्तव्य, जबाबदारी बद्दल सखोल मार्गदर्शन केले. शिवाजी नरोटे यांनीही मार्गदर्शन केले. कायदेशीर बाबीवर डॉ. सतीश गोगुलवार, केशव गुरनुले यांनी मार्गदर्शन केले. मोहगाव ईलाख्यातील ग्रामसभा, ईलाखा ग्रामसभामार्फत स्वतंत्रपणे चालवत असलेल्या गोंडी लिपी शोळेची तसेच संपूर्ण ग्रामसभांची प्रक्रिया ग्रामसभांचे अध्यक्ष आचले यांनी सादर केली.