संज्ञा चैतन्यच्या मुलांचे प्रभावी सादरीकरण

04 Dec 2025 16:07:02
नागपूर,
International-day-of-disabilities जागतिक दिव्यांग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात संज्ञा चैतन्य सोसायटीच्या विनया बेडेकर व वेदा टोकेकर यांनी भगवद्गीतेच्या बाराव्या अध्यायाचे पठण करून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाला उपस्थित प्रशासनातील अधिकाऱ्यांनी दोन्ही विद्यार्थिनींचे अभिनंदन करत, अशा आध्यात्मिक-सांस्कृतिक उपक्रमांमुळे दिव्यांग मुलांची स्मरणशक्ती, एकाग्रता आणि सामाजिक सहभाग वाढतो, असे मत व्यक्त केले.

divan 
 
 
महिला क्लब नागपूरच्या 9 नोव्हेंबरच्या ‘मनोबल’ विशेष कला प्रदर्शनात संज्ञा चैतन्यच्या विद्यार्थ्यांनी गीता पठणासोबत देवीच्या गोंधळावर दमदार नृत्य सादर करत विशेष पारितोषिक मिळवले. International-day-of-disabilities तसेच 2025 च्या खासदार सांस्कृतिक महोत्सवातील सामूहिक गीता पठणातही विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासपूर्ण सहभाग नोंदवून आपली कला आणि क्षमता दाखवून दिली.सांस्कृतिक, सामाजिक आणि धार्मिक उपक्रमांत संज्ञा चैतन्यचे विद्यार्थी सामान्य मुलांप्रमाणेच उत्साहाने सहभाग घेऊन उत्कृष्ट आदर्श निर्माण करत आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्थेचे अध्यक्ष शेखर दामले, पदाधिकारी, सहकारी आणि पालकांचे सातत्यपूर्ण सहकार्य लाभत असून, समाजाच्या पाठिंब्याबद्दल संस्थेने कृतज्ञता व्यक्त केली आहे.
सौजन्य: ॲड. भाग्यश्री दिवाण,संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0