भैया ये लो, अब फूंक मारो...रोहित-पंतचा व्हिडीओ व्हायरल

04 Dec 2025 10:55:23
रायपुर,
rohit-pant video ३ डिसेंबरच्या रात्री दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्याच्या डावाच्या ब्रेकदरम्यान भारतीय संघातील स्टार खेळाडू रोहित शर्मा आणि ऋषभ पंत यांच्यात एक मजेशीर व्हिडिओ व्हायरल झाला आहे, भारतीय संघ ३५८ धावांचे लक्ष्य रक्षण करण्यासाठी मैदानात उतरायला सज्ज हो, या वेळी अतिरिक्त खेळाडू ऋषभ पंतने त्याच्या गोंडस हावभावाने प्रेक्षकांचे लक्ष वेधले. रोहित डगआउटसमोर सीमारेषेवर उभा असताना पंतने त्याची पडलेली पापणी उचलली आणि रोहितच्या मनगटावर ठेवली. पंतने रोहितला त्यावर इच्छा व्यक्त करत फुक मारायला लावले. त्यानंतर दोघेही आकाशाकडे पाहत होते. सोशल मीडियावर लोक या घटनेला "पुकी अ‍ॅक्ट" म्हणत आहेत.
 
 
srushab and rohit
रोहितची काय इच्छा होती, हे अद्याप माहिती नाही, पण व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर चाहते अंदाज लावत आहेत. काहीजण म्हणतात की रोहितला २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषक संघात स्थान मिळावे अशी इच्छा होती, तर काहीजण पुढच्या सामन्यात शतक करण्याबद्दल बोलत आहेत. ऋषभ पंत या सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये नव्हता. रांचीतील पहिल्या एकदिवसीय सामन्यातही त्याला डगआउटमध्येच ठेवण्यात आले होते. संघाचे कार्यवाहक कर्णधार केएल राहुल यष्टीरक्षकाची जबाबदारी सांभाळत आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0