मराठवाडा, विदर्भ पुन्हा गारठणार!

04 Dec 2025 14:24:36
पुणे,
Vidarbha will experience cold again दितवाह नावाच्या चक्रीवादळाचा सावट सरल्यावर हवामानात बदल दिसू लागला असून, महाराष्ट्रात पुन्हा थंडीचा प्रभाव जाणवू लागला आहे. घाटमाथ्यावरील भागांमध्ये कडाक्याची थंडी वाढली असून राज्यभर गारठ्याचा मोठा मुक्काम स्पष्ट होत आहे. देशाच्या उत्तरेकडील पर्वतीय राज्यांमध्ये किमान तापमानात घट झाली असून उंच पर्वतरांगांमध्ये हिमवर्षाव वाढला आहे, ज्यामुळे या भागांमध्ये तापमान उणेच्या श्रेणीत दिसत आहे. उत्तरेकडील फक्त पर्वतीय भाग नव्हे, तर मैदानी प्रदेशांमध्येही थंडी वाढली आहे. मध्य भारताकडे वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे महाराष्ट्रातही तापमानात घट झाली असून हवामान विभागाने पुढील ४८ तास फक्त गारठ्याचे राहणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. विशेषतः मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, पंजाब आणि हरियाणा या भागांमध्ये थंडीचे प्रमाण जास्त राहील, तर राज्यात तळ कोकण सोडून सर्वत्र गारठा जाणवेल.
 
 

maharashtra cold 
 
 
घाटमाथ्यावरील प्रदेशांमध्ये धुक्याची चादर पसरली असून, विदर्भमध्ये किमान तापमान सरासरी ७ अंश सेल्सिअस इतके असेल, तर कमाल तापमान सरासरी ३३ अंश सेल्सिअस इतके राहील. समुद्रावर तयार झालेल्या चक्रीवादळसदृश्य परिस्थिती कमकुवत झाली असली तरी दक्षिण भारतात पावसाचा इशारा कायम आहे. कमी दाबाच्या पट्ट्यांमुळे पुढील २४ तासांत केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकच्या किनारपट्टीवर अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. तर हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि काश्मीरच्या खोर्‍यांमध्ये पश्चिमी झंझावात सक्रीय होण्याने काही ठिकाणी पाऊस आणि हिमवृष्टीमुळे हाडं गोठवणारी थंडी पडण्याची शक्यता आहे.
Powered By Sangraha 9.0