एक कोटी गुंतवा आणि 15 दिवसांत मिळवा 1.40 कोटी रुपये

05 Dec 2025 12:44:47
अनिल कांबळे
नागपूर,
professor cheated एक कोटी रुपये गुंतवा आणि 15 दिवसांत मिळवा एक कोटी 40 लाख रुपये अशी योजना सांगून बनावट गुंतवणूक फर्म चालवणाऱ्या पाच जणांनी संगनमत करीत एका प्राध्यापकाची एक काेटी रुपयांनी फसवणूक केली. हा प्रकार गुरुवारी समाेर आला. फसवणूक करणाऱ्या या पाच जणांपैकी एकाला सदर पाेलिसांनी अटक केली. फसवणुकीतला सूत्रधार छत्तीसगडमधील रायपूर येथील रहिवासी असल्याची माहिती आहे.
 
 

फसवणूक  
 
 
विजय केशवराव टाेपे (52) रा. संतकृपा निवास, अंबापेठ, अमरावती असे एक काेटी रुपयांची फसवणूक झालेल्या प्राध्यापकांचे नाव आहे. गुंतवणूकीवर 15 दिवसांत 40 टक्के ना कमावून देताे, असे आमिष दाखवत टाेपे यांना प्रशांत नायडू (50) रा. कामठी, महेश वरघडे (45) रा. मानेवाडे, संताेष सातपुते रा. बुलडाणा, विजय बघेल रा. रायपूर यांनी गुंतवणूक करण्यात भाग पाडले. यातील बुलढाणा जिल्ह्यातील रहिवासी संताेष हा एका मित्रांर्माफत टाेपे यांच्या संपर्कात आला हाेता. गुंतवणूक केली तर अल्पावधीत 40 टक्क्यांपर्यंत ना कमावता येताे, असे आमिष दाखवत संताेषने टाेपे यांची नागपुरात अन्य पाच जणांची ओळख करून दिली. त्यावर विश्वास बसल्याने टाेपे यांनी काही जणांना ही याेजना समजावून सांगत आठ मित्रांनी मिळून या पाच जणांकडे 1 काेटी रुपये गुंतवले. टाेपे यांनी नागपुरातील एका खासगी गुंतवणूक कंपनीच्या कार्यालयात ही रक्कम ठकबाजांकडे दिली. त्यावर 15 दिवसांत 1 काेटी 40 लाखांचा परतावा देऊन हे पाचही जण बेपत्ता झाले.professor cheated फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर टाेपे यांनी सदर पाेलिसांत तक्रार केली. त्यावरून गुन्हा दाखल करत पाेलिसांनी संताेष सातपुते याला अटक केली. रायपूर येथील रहिवासी विजय बघेल हा या बनावट गुंतवणूक कंपनीचा सूत्रधार असून पाेलिस त्याच्या अटकेसाठी छत्तीसगड पाेलिसांशी संपर्कात आहेत.
काेडवर्ड पावतीची थाप
आराेपींनी काेडवर्ड असलेली पावती दिली. यानंतर आराेपींनी रक्कम व्हाईट स्क्वेअर टेक्नाॅलाॅजी कंपनीत गुंतवली आहे, पण कंपनीकडून एन.ओ.सी. (ना हरकत प्रमाणपत्र) व कन्फर्मेशन मिळाले नाही आणि कंपनीचे ऑफिस बंद आहे, असे कारण दिले. आपली फसवणूक हाेत असल्याचे समजाताच विजय टाेपे यांनी गुंतवलेली रक्कम परत मागितली असता आराेपींनी टाळाटाळ करून माेबाईल फोन बंद केले. आराेपींनी काेणत्याही प्रकारचा ना किंवा मुद्दल परत न करता टाेपे आणि त्यांच्या मित्रांचा विश्वासघात करून एक काेटी रुपयांची आर्थिक फसवणूक केली.
Powered By Sangraha 9.0