बिहारमध्ये शस्त्र तस्करी प्रकरणात एनआयएची मोठी कारवाई

05 Dec 2025 17:00:01
बिहार,
NIA raids Bihar, बिहारमधील शस्त्र तस्करी प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) ने मोठी कारवाई करत सात ठिकाणी छापेमारी केली आहे. या कारवाईत दोन संशयितांना अटक करण्यात आली असून, शस्त्रांबरोबरच मोठ्या प्रमाणात दारूगोळाही जप्त करण्यात आले. ही कारवाई ४ डिसेंबर रोजी करण्यात आल्याची माहिती एनआयएने दिली.
 
 

NIA raids Bihar 
एनआयएच्या तपासानुसार, बिहार, हरियाणा आणि उत्तर प्रदेश या तीन राज्यांमध्ये या प्रकरणाशी संबंधित २२ ठिकाणी छापेमारी करण्यात आली, ज्यात चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. बिहारमधील नालंदा, शेखपुरा आणि पाटणा जिल्ह्यांमधील सात ठिकाणी एनआयएच्या २२ पथकांनी छापे टाकले. यामध्ये पाटण्यातून शशी प्रकाश याला अटक करण्यात आली आहे. नालंदा जिल्ह्यातील बारादरी आणि भागन बिघा येथील घरांवरही छापे टाकून संशयितांची चौकशी करण्यात आली.
या NIA raids Bihar, कारवाईपूर्वीच जुलै २०२५ मध्ये नालंदा पोलीस आणि स्पेशल टास्क फोर्सनं सोहराई पोलीस ठाण्यातील आशा नगर येथील अभिजीत कुमार उर्फ रॉबिन राय यांच्या घरातून ७१७ जिवंत काडतुसे जप्त केले होते. भागन बिघा येथील घरातून आणखी ११७ गोळ्या जप्त करण्यात आल्या.
 
 
शेखपुरा NIA raids Bihar, जिल्ह्यातील सिरारी पोलीस स्टेशन परिसरातील भदौस आणि जयमंगला गावांमध्ये देखील एनआयएने छापेमारी केली. यावेळी गुड्डू सिंह उर्फ रवी रंजन याला अटक करण्यात आली. त्याच्या घरातून कार, अनेक मोबाईल फोन, बनावट ओळखपत्रे आणि महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली. सिरारी पोलीस अधिकारी आयुष कुमार यांनी सांगितले की, गुड्डू सिंहवर स्थानिक पोलीस ठाण्यात शस्त्र कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल असून, तो न्यायालयीन जामिनावर होता. तथापि, विशेष पथकाने शस्त्र तस्करीच्या प्रकरणात त्याला अटक केली.सिरारी पोलिसांच्या माहितीनुसार, या छापेमारीदरम्यान एक कोटी रुपयांपेक्षा जास्त रोख रक्कम आणि मोठ्या प्रमाणात शस्त्रं आणि दारूगोळा जप्त करण्यात आला. अनेक डिजिटल इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि महत्त्वाची पुरावे देखील हस्तगत करण्यात आले.
एनआयएने सांगितले की, या प्रकरणाचा तपास जुलै २०२५ मध्ये बिहारमध्ये सुरू झाला. हरियाणा आणि उत्तर प्रदेशमधून बिहार तसेच देशाच्या इतर भागात शस्त्र तस्करी केली जात असल्याची माहिती मिळाल्यामुळे ऑगस्टमध्ये या प्रकरणाचा तपास एनआयएने सुरू केला.ही कारवाई राज्यातील शस्त्र तस्करीच्या सखोल नेटवर्कवर पडताळणी करण्यासाठी महत्त्वाची ठरली असून, पुढील तपासानंतर आरोपींवर अतिरिक्त गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे.
Powered By Sangraha 9.0