दिव्यांग दिनी भव्य मेडिकल शिबिर

05 Dec 2025 12:51:42
नागपूर,
disabled day येथे जागतिक दिव्यांग दिनानिमित्त भाजप दक्षिण–पश्चिम कार्यालयात दिव्यांग बांधवांसाठी मोफत मेडिकल व मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले. सुनील मित्रा साहेबांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या उपक्रमाला विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली.डॉ. उपेंद्र कोठेकर दयाशंकर तिवारी, गिरीश देशमुख, सुधाकर कोहळे, ईश्वर ढेंगरे आणि नितीन महाजन यांची प्रमुख उपस्थिती होती. भाजपा दिव्यांग विकास आघाडीचे अम्मोल देवाजी वालके आणि डॉ. विनोद दाडे यांच्या पुढाकारातून शिबिर यशस्वी करण्यात आले.
 

din 
 
 
शालिनी ताई मेघे हॉस्पिटल आणि माधव नेत्रालयाच्या डॉक्टरांनी फिजिओ, जनरल चेक-अप, रक्तातील साखर, नेत्र तपासणी आदी सेवा दिल्या. disabled day  CRC सेंटरतर्फे व्हीलचेअर सुविधा, उत्कृष्ट जेवण आणि आवश्यक सोयी दिल्याने दिव्यांग बांधवांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.नागपूर, कामठी, सावनेर आदी भागांतून ३२० दिव्यांग बांधवांनी सहभाग नोंदवत कार्यक्रम यशस्वी केला.
सौजन्य :वर्षा नानोटी,संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0