शिक्षक मतदारसंघाची प्रारुप यादी प्रसिद्ध

05 Dec 2025 10:57:19
अमरावती, 
teachers constituency published मतदारसंघांसाठी १ नोव्हेंबर या अर्हता दिनांकावर आधारित नवीन मतदार यादी तयार करण्याचे सुधारित वेळापत्रक भारत निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. त्यानुसार अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाची प्रारुप मतदार याद्यांची प्रसिद्धी बुधवार, ३ डिसेंबर २०२५ रोजी करण्यात आली आहे. मतदार यादीची प्रत विभागीय, जिल्हा, उपविभागीय व तहसील स्तरावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, असे अपर आयुक्त संजय जाधव यांनी प्रसिद्धी पत्रकाव्दारे कळविले आहे.
 

yadi 
 
 
मतदार नोंदणी अधिनियम, १९६० नुसार या पुनरिक्षण कार्यक्रमाचे टप्पे आखण्यात आले आहे. त्यानुसार हस्तलिखिते तयार करणे आणि प्रारुप मतदार याद्यांची छपाई २८ नोव्हेंबर, २०२५ रोजी करण्यात आली आहे. तसेच ३ डिसेंबर २०२५ रोजी प्रारुप मतदार याद्यांची प्रसिद्धी करण्यात आली आहे. मतदार नोंदणी अधिनियम १९६० चे कलम १२ अंतर्गत, मतदार याद्यांवर ३ ते १८ डिसेंबर या कालावधीत दावे व हरकती स्वीकारण्यात येतील. तसेच दावे व हरकती ५ जानेवारी २०२६ रोजी निकाली काढण्यात येतील. याच दिवशी पुरवणी यादी तयार करणे व छपाई करण्यात येणार आहे.teachers constituency published या दावे व हरकतीचा कालावधी संपल्यानंतर १२ जानेवारी २०२६ रोजी अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल.
मतदार नोंदणी अधिनियम १९६० मधील नमुना ५ नुसार प्रारुप मतदार यादी प्रसिद्धीची सूचना प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तसेच मतदार नोंदणीमध्ये अद्याप पात्र शिक्षक नाव नोंदणी करण्याचे कोणी राहिले असल्यास किंवा इच्छुक असल्यास अमरावती विभाग शिक्षक मतदार संघामध्ये नोंदणी करु शकतात, असे विभागीय आयुक्त कार्यालयाच्यावतीने कळविण्यात आले आहे.
मतदार नोंदणी कार्यक्रमानुसार ३० सप्टेंबर ते ६ नोव्हेंबर या दरम्यान अमरावती विभागातील सर्व जिल्ह्यांमध्ये पदनिर्देशित अधिकारी तथा तहसीलदार यांच्या स्तरावर अर्ज स्वीकृत करण्यात आले आहे.
Powered By Sangraha 9.0