रात्री कॉल आणि संबंधांचा दबाव; न मानल्यास नापास करण्याची धमकी

05 Dec 2025 13:26:40
भुवनेश्वर,  
drama-teacher-sexual-harassment उत्कल संगीत महाविद्यालयात एका विद्यार्थिनीला उशिरा रात्री फोन करून अश्लील बोलण्यास, तसेच जबरदस्तीने संबंध ठेवण्यास भाग पाडल्याच्या गंभीर आरोपांवरून नाट्य विभागातील अतिथी शिक्षक शत्रुघ्न सामल (62) याला खारवेल नगर पोलिसांनी अटक केली आहे. विद्यार्थिनींना सतत मानसिक, शारीरिक छळ आणि गुण कमी देण्याची धमकी दिल्याचा आरोपही त्यांच्या विरोधात करण्यात आला आहे.
 
drama-teacher-sexual-harassment
 
घटनेनंतर महाविद्यालयात तीव्र तणाव निर्माण झाला असून विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरून निदर्शने केली. प्राप्त माहितीनुसार, सहा महिन्यांपूर्वी सामलची महाविद्यालयाच्या नाट्य विभागात अतिथी शिक्षक म्हणून नियुक्ती झाली होती. परंतु काही दिवसानंतरच त्यानी शिकवण्याऐवजी विद्यार्थिनींशी जवळीक वाढवण्याचे प्रयत्न सुरू केले. नाटक शिकवण्याच्या निमित्ताने ते विद्यार्थिनींचे मोबाईल नंबर घेत आणि रात्री उशिरापर्यंत खाजगी संभाषणासाठी फोन करत. संवादाच्यावेळी तो विद्यार्थिनींना ‘शिक्षिका’ नव्हे तर ‘प्रेयसी’प्रमाणे वागण्यास भाग पाडत होता. drama-teacher-sexual-harassment विद्यार्थिनी विरोध करताच, कमी गुण देण्याची किंवा थेट परीक्षेत नापास करण्याची धमकी ते देत. या भीतीमुळे अनेक मुली तोंड उघडण्यास घाबरत होत्या. अखेर एका विद्यार्थिनीने धैर्य दाखवत शिक्षकासोबतच्या अश्लील संभाषणाचे ऑडिओ रेकॉर्डिंग केले. त्या ऑडिओमध्ये सामल विद्यार्थिनीच्या शरीराच्या संवेदनशील अवयवांवर टिप्पणी करत असल्याचे स्पष्ट ऐकू येत होते. विद्यार्थिनीने त्यांना असे करू नका असे सांगताच, शिक्षकांनी महाविद्यालयातही तिला धमकावणे सुरू केले.
तिने हा प्रकार आपल्या मैत्रिणींना सांगितल्यानंतर गुरुवारी विद्यार्थी-विद्यार्थिनींचा राग भडकला. त्यांनी प्राचार्यांना भेटून शिक्षकाविरोधात कठोर कारवाईची मागणी केली. कारवाई लांबल्याने संताप वाढला आणि विद्यार्थ्यांनी थेट रस्त्यावर उतरून धरणे सुरू केले. drama-teacher-sexual-harassment या आंदोलनाचा परिणाम म्हणून परिसरातील वाहतुकीत मोठा अडथळा निर्माण झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि संस्कृती विभागाचे विशेष सचिव देवप्रसाद दास यांच्या नेतृत्वाखालील तीन सदस्यीय पथक महाविद्यालयात आले. विद्यार्थ्यांशी चर्चा केल्यानंतर महाविद्यालय प्रशासनाने आरोपी शिक्षकाला तत्काळ बर्खास्त केले. विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून पोलिसांनी सामल यांना अटक करून न्यायालयात हजर केले. जामीन मिळाला नसल्याने त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले आहे.
Powered By Sangraha 9.0