नागपूर,
gold and silver prices गत महिन्याभराच्या कालावधीत सोने आणि चांदीच्या दरांनी मोठी वाढ झाली आहे. २४ कॅरेट सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅममध्ये ७ हजार ८०० रुपयांची तर चांदीच्या दरात प्रतिकिलोमागे ३० हजार रुपयांची विक्रमी वाढ विशेषत: सोन्या चांदीच्या तेजीमुळे बुधवारी एकाच दिवसात सोने ९०० रुपयांनी तर चांदीचे दर ५,५०० रुपयांनी वाढले. सोने-चांदीत गुंतवणूक करणार्या ग्राहकांना सोने-चांदीतून मोठा लाभ होत असल्याने दिवाळीनंतर सुध्दा खरेदी करिता ग्राहक दिसून येत आहे.

विवाह कार्यक्रमासाठी सध्या इतवारीच्या सराफा बाजारात वर्दळ दिसून येत आहे. सोन्या-चांदीच्या दरातील ही मोठी वाढ प्रामुख्याने घडामोडी, आर्थिक अनिश्चितता आणि मध्यवर्ती बँकांच्या धोरणांचा थेट परिणाम असल्याची प्रतिक्रिया सराफा व्यापार्यांनी व्यक्त केली आहे. गत वर्षभरापासून सौर ऊर्जा, इलेक्ट्रिक वाहने आणि इलेक्ट्रॉनिक्स उद्योगांमध्ये चांदीची मागणी सतत वाढत आहे. औद्योगिक क्षेत्राकडून चांदीची मागणी वाढल्याने चांदीचे दर सुध्दा वाढले आहे.gold and silver prices सराफा बाजारातील व्यापार्यांनी दिलेल्या माहितीनुसार २४ कॅरेट सोने (१० ३ नोव्हेंबर रोजी १,२१,१०० रुपये असा दर होता. तर एक महिन्यानंतर ४ डिसेंबर रोजी १,२८,३०० रुपये दर झाला आहे. याशिवाय चांदी (किलो)चा दर ३ नोव्हेंबर रोजी १,५१,००० रुपये होता तर ४ डिसेंबर रोजी १, ७९,५०० रुपये आहे. सोने-चांदीच्या दरावर ३ टक्के जीएसटी वेगळा घेतल्या जातो. सोने आणि चांदीत आगामी तेजी राहण्याची शक्यता आहे.