गोंदिया,
RTC officer bribery येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी एका खाजगी इसमामार्फत पर प्रांतातून खरेदी करण्यात आलेल्या जेसीबी मशीनची गोंदिया येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात नोंदणी करण्यासाठी 70 हजार रुपयांची लाच मागितली होती. नागपूर येथील लाचवेसे प्रतिबंधक विभागाने चार डिसेंबर रोजी कारवाई करून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले होते. आज ५ डिसेंबर रोजी दोन्ही आरोपींनी त्यांच्या वकीललामार्फत न्यालयात जामिनासाठी अर्ज केला असता न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे.
तक्रारदार यांनी पश्चिम बंगाल येथून जेसीबी यंत्र खरेदी केले होते. या जेसीबी यंत्राची गोंदिया येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात नोंदणी करण्यासाठी आरोपी राजेंद्र केसकर यांनी खाजगी इसमामार्फत ७० हजार रुपयाची लाच मागणी केली होती. परंतु तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी नागपूर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे १८ नोव्हेंबर रोजी तक्रार केली. १९ नोव्हेंबर रोजी खाजगी इसम राजेश माहेश्वरी यांची पंचासमक्ष पडताळणी केली असता त्याने तक्रारदार यांना पश्चिम बंगाल येथून खरेदी केलेले जेसीबी वाहन उपप्रादेशिक परिवहन कार्यालय गोंदिया येथे नोंदणी करण्यासाठी टॅक्स व्यतिरिक्त ७० हजार रुपये रुपये लाच रक्कम स्वतः व केसकर यांचे करिता मागणी करून ही रक्कम स्वतः स्वीकारण्यास सहमती दर्शवली होती. या अनुषंगाने ४ डिसेंबर रोजी राजेश माहेश्वरी यांनी तक्रारदार यांचेकडून ७० हजार रुपये लाच रक्कम आरोपी राजेंद्र केसकर यांच्यासाठी व स्वतःसाठी स्वीकारली.
आरोपी राजेश माहेश्वरीची अंग झळतीत लाचेचे ७० हजार रुपये व इतर १९०५९ रुपयांची रक्कम, एक मोबाईल ताब्यात घेण्यात आले होते. राजेंद्र केसकर यांना ताब्यात घेत त्यांच्या घराची झडती घेण्यात आली. रगोंदि या ग्रामीण पोलिस ठाणे येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988(सुधारणा 2018) कलम 7अ, 12 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान आज पाच डिसेंबर रोजी दोन्ही आरोपींनी त्यांच्या वकिलामार्फत येथील जिल्हा न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता यावर न्यायालयाने दोन्ही आरोपींना जामीन मंजूर केला आहे.