उधारीच्या क्षुल्लक वादातून मजुराचा खून

05 Dec 2025 13:04:57
अनिल कांबळे
नागपूर, 
laborer murdered वापरायला दिलेली दुचाकी परस्पर विकल्यामुळे आणि उधार दिलेले पैसे परत करत नसल्याने संतापलेल्या दाेघांनी साेबत काम करणाऱ्या एका मजुराचा दगडाने ठेचून खून केला. कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीला लागून असलेल्या लाकूड कटाईच्या आरा मशीन केंद्राजवळ गुरुवारी पहाटे ही थरारक खुनाची घटना घडली. महेश लतेलुराम डहारे (22) रा. गांधी नगर, चिखली झाेपडपट्टी असे खून झालेल्या मजुराचे नाव आहे. गुरुवारी पहाटे महेश मृतदेह रक्ताने माखलेला दिसल्याने परिसरातील मजुरांनी पाेलिसांना याची माहिती दिली.
 

खून  
 
 
महेश डहारे हा बुधवारी रात्री शेकाेटीजवळ बसलेला हाेता. त्यावेळी चंद्रेश उफर् राणू वर्मा (25) रा. भरतवाडा, रितिक नंदेश्वर (25) रा. चिखली झाेपडपट्टी हे दाेघे त्याच्या जवळ आले. या दाेघांचेही महेशकडून प्रत्येकी 25 ते 30 हजार रुपये घेणे हाेते. गेल्या अनेक दिवसांपासून ताे पैसे देत नसल्याने दाेघांनी त्याच्यासाेबत रात्री वाद घातला. उधारीच्या पैशावरून तिघांमध्ये वादावादी झाली. हा वाद विकाेपाला गेल्यानंतर संतापाच्या भरात दाेघांनी महेशच्या डाेक्यात दगडाने वार करत त्याला ठार केले.सकाळी या घटनेची माहिती मिळताच परिसरातील मजुरांनी सांगितलेल्या माहितीनुसार पाेलिसांनी लगेच चंद्रश उफर् राणूला अटक केली. त्याचा दुसरा साथिदार रितिक फरार असून पाेलिस त्याचा शाेध घेत आहेत.
परस्पर विकली हाेती दुचाकी
पाेलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी रितिक नंदेश्वर याच्याकडून महेशने एक दुचाकी घेतली हाेती. नंदेश्वरने ही दुचाकी केवळ त्याला वापरण्यासाठी दिली हाेती.laborer murdered त्याची कागदपत्रेही नंदेश्वरकडे हाेते. मात्र, महेशने त्याच्या परवानगीशिवाय नंदेश्वरची दुचाकी परस्पर विकली हाेती. त्याचाही नंदेश्वरच्या मनात राग हाेता.
Powered By Sangraha 9.0