नागपूर,
Maharashtra agricultural markets महाराष्ट्रातील कृषी व्यापाराला बळ देण्यासह व्यवसाय सुलभता वाढवण्यासाठी, चेंबर ऑफ असोसिएशन्स ऑफ महाराष्ट्र इंडस्ट्री अँड (कॅमिट) कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या बाजार शुल्क संरचनेत तातडीने सुलभीकरण आणि सुसूत्रता आणण्याची मागणी कॅमिटचे अध्यक्ष दीपेन अग्रवाल यांनी केली आहे. कॅमिटच्या वतीने राज्य पणन संचालक संजय कदम यांची भेट घेऊन यासंदर्भात निवेदन देण्यात आले.
सध्याची बाजार शुल्क Maharashtra agricultural markets रचना गुंतागुंतीची असून कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एकसमानता नाही. यामुळे समस्या होतात. शुल्क संरचनेतील प्रक्रिया वेळखाऊ ठरते आणि प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या शेवटी शेतकरी आणि व्यापार्यांवर आर्थिक बोजा पडतो. या शुल्कांचे सुलभीकरण केल्यास शेतकर्यांना त्यांच्या मालाची चांगली किंमत मिळण्यास मदत होईल, असे मत मांडले. राज्य पणन संचालकांना या सर्व शुल्कांचा आढावा घेऊन एकसमान आणि न्याय्य शुल्क प्रणाली लागू करण्याची विनंती कॅमिटने