वर्धा,
MGNREGA scam, आर्वी पंचायत समितीत घडलेल्या मनरेगा निधी घोटाळा प्रकरणाचा तपास आर्वी पोलिसांकडून होत आहे. आतापर्यंत ७० लाखांहून अधिकच्या शासकीय निधीचा अपहारात बडतर्फ एपीओ प्रणाली कसर नंतर बीडीओ सुनीता मरसकोल्हे यांना अटक झाली. आज शुक्रवार ५ रोजी पोलिसांनी आर्वी पंसतील सहाय्यक कार्यक्रम अधिकारी व कनिष्ठ लेखा अधिकारी यांच्याकडून अधिकची माहिती जाणून घेतली.
आर्वी पोलिसांनी सुरुवातीला बडतर्फ सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रणाली कसर हिला अटक करून तिची ३ दिवसीय पोलिस कोठडी मिळविली. कोठडीदरम्यान तपास अधिकार्यांनी मुख्य आरोपी प्रणाली कसर हिचे बयाण नोंदविले. या बयाण नोंदवताना शासकीय निधीचा MGNREGA scam अपहार करताना तिला सहकार्य करणार्या दहापेक्षा जास्त व्यक्तींचे नावं सांगितले. त्यानंतर सहआरोपी म्हणून आर्वीच्या गटविकास अधिकारी सुनीता मरसकोल्हे यांना अटक झाली. मरसकोल्हे यांच्या निवासस्थानावरून ६० हजारांची रोख जप्त करून त्यांचे बयाणही नोंदविण्यात आले. शुक्रवारी, पोलिसांनी कनिष्ठ लेखा अधिकारी दिगांबर चव्हाण व महिला सहाय्यक कार्यक्रम अधिकार्यांना चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. या प्रकरणात आणखी काही आरोपींची संख्या वाढण्याची शयता वर्तवण्यात येत आहे.