अमरावती,
murder पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिची हत्या करणार्या पतीला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना मौजा खैरी ता. अचलपूर येथील पारधी बेड्यावर बुधवारी रात्री घडली. जानराव उर्फ ज्ञान्या भोसले (वय ३५ वर्ष) हा त्याची पत्नी सबाना भोसले (वय ३२ वर्ष) हीच्या चारित्र्यावर नेहमी संशय घेऊन तिला मारहाण करीत असे.

बेडयातील कुणी भांडण सोडविण्यास गेले असता त्याना सुध्दा शिवीगाळ करती होता. त्यांच्या नेहमीच्याच भांडणामुळे व पतीचे स्वभावामुळे कुणीही भांडण सोडविण्यास जात नसे. त्याने त्याचे सासू व सासरे यांना सुध्दा मारहाण करून घराबाहेर काढले. त्यांच्यावर भीक मांगण्याची परिस्थिती निर्माण केली. ३ डिसेंबरच्या रात्री पती जानरावने पत्नीसोबत भांडण केले व तीला बांबुचे काठीने खूप मारहाण करून खून केला. त्यांना दोन लहान मुले आहेत. घटनास्थळी फॉरेन्सीक व्हॅन, फिंगर प्रिन्ट एक्सपर्ट यांना पाचारण करून आरोपीविरूध्द सबळ पुरावे गोळा करण्यात आले आहेत.murder खून केलयानंतर जानराव सकाळी फरार होण्याच्या तयारीत असताना त्यास शिताफिने पोलिस पाटील धनश्री दिपक काळे यांचे मदतीने आसेगांव पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीविरूध्द खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे मार्गदर्शनात ठाणेदार सुरज तेलगोटे, पोउपनि सुरज सुसतकर, इजहार गणी, नागराज स्वामी, पंकज गांवडे, शोएब देशमुख, संभाजी टिपरे, राहुल चारथळ यांनी केली आहे.