केवळ ४५३ शेतकर्‍यांनीच काढला विमा

05 Dec 2025 15:32:55
वर्धा,
farmers insurance यावर्षी खरीप हंगामात शेतकर्‍यांचे पीक हातातून गेले. आता शेतकर्‍यांची आशा रब्बी पिकावर टिकली आहे. यावर्षी जिल्ह्यात ६३ हजार ५८२.९७ हेटरवर रब्बी पिकांची लागवड केली आहे. मात्र, या पिकांच्या संरक्षणासाठी काढण्यात येणार्‍या पीक विम्याकडे शेतकर्‍यांनी पाठ फिरवली आहे. जिल्ह्यात केवळ ४५३ शेतकर्‍यांनी पीक विमा काढला आहे.
 

पीक विमा योजना  
 
शेतकर्‍यांच्या पिकांना संरक्षण देण्यासाठी राज्य शासनाने गेल्या वर्षी एक रुपयांत पीकविमा योजना सुरू केली होती. यामुळे जिल्ह्यातील ३६ हजार ३९९ शेतकर्‍यांनी रब्बी हंगामातील पीकविमा उतरविला होता. परंतु, एक रुपयांत पीक विमा या योजनेत अनियमिता आढळून आल्यानंतर ही योजना बंद करण्यात आली व पीक विमा संरक्षणाची जुनीच विमा प्रणाली लागू करण्यात आली आहे. यावर्षीच्या रब्बी हंगामात केवळ ४५३ शेतकर्‍यांनी ७३ हजार ६३२ हेटरवरील पिकांसाठी विमा काढला आहे. विम्यासाठी १५ डिसेंबर ही शेवटची मुदत आहे. रब्बी हंगामातील पीक संरक्षित करण्यासाठी आर्वी तालुयातील २२ शेतकर्‍यांनी ८ हजार ६७८, आष्टी तालुक्यात १३ शेतकर्‍यांनी ५ हजार ९७७, देवळी तालुयात १३४ शेतकर्‍यांनी ७७ हजार ६६२, हिंगणघाट तालुयात १६७ शेतकर्‍यांनी १ लाख १ हजार ९९९, कारंजा तालुयात २३ शेतकर्‍यांनी १० हजार ८९८, समुद्रपूर तालुरूात ४८ शेतकर्‍यांनी २९ हजार ४७०, सेलू तालुयात १९ शेतकर्‍यांनी ९ हजार २०४ तर वर्धा तालुक्यात २७ शेतकर्‍यांनी १४ हजार ६२९ रुपये पीक विमा कंपनीकडे भरली आहे. त्यामुळे या शेतकर्‍यांच्या पिकांना संरक्षण मिळाले आहे.
यावर्षीच्या रब्बी हंगामात शेतकर्‍यांनी १४ हजार ११९. ७० हेटरवर गहू तर ४९ हजार ७०.६० हेटरवर चणा, ज्वारी २३२. ९७ हेटर, मोहरी ७. ८० हेटर, जवस १७ हेटर आदी पिकांची या रब्बी हंगामात लागवड करण्यात आली आहे.farmers insurance सुधारित प्रधानमंत्री पीकविमा योजना रब्बी हंगाम सन २०२५-२६ अंतर्गत गहू पिकाकरिता शेतकर्‍यांनी भरावयाचा पीकविमा हप्ता रकम ३३० रुपये प्रतिहेटर आहे. हरभर्‍याकरिता पीक विमा हप्ता ३३० रुपये प्रतिहेटर भरायचा आहे.
Powered By Sangraha 9.0