नागपूर,
Nagpur District President पोलीस बॉईज असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद वाघमारे यांनी झालेल्या बैठकीत नागपूर जिल्हाध्यक्षपदी राजेश हरडे यांची नियुक्ती जाहीर केली. वाघमारे यांनी सांगितले की, राजेश हरडे हे अनेक वर्षांपासून पोलीस खात्याशी संबंधित सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. कोरोना महामारीच्या काळात त्यांनी गोरगरीब, होतकरू आणि बेघर नागरिकांना निस्वार्थ भावनेने मदत केली. त्यांच्या सेवाभावी वृत्तीमुळे आणि उल्लेखनीय कार्यामुळे त्यांना जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
नागपूर शहर व ग्रामीण विभागातील प्रतिनिधींनीही त्यांचे अभिनंदन केले. ते शहर व ग्रामीण भागात दौरे करून संघटनेचा विस्तार, बळकटीकरण आणि पोलीसांशी संबंधित समस्या सोडवण्याचे कार्य आपल्या टीमसोबत राबवतील, असे सांगितले. Nagpur District President नियुक्तीनंतर राजेश हरडे यांनी संस्थापक अध्यक्ष प्रमोद तानाजी वाघमारे, पोलीस बॉईज असोसिएशन महाराष्ट्र सचिव भूपेंद्र निमगडे, डॉ. भूषण सोळंकी, ॲड. अंकुश पानतावणे आणि बबन सोमकुंवर यांचे आभार मानले, तसेच त्यांच्या नियुक्तीबद्दल उच्चस्तरीय अभिनंदन मिळाल्याचेही सांगितले.
सौजन्य: राजेश हरडे, संपर्क मित्र