नर्मदाभक्त किशोर पौनीकर यांच्या लेखसंग्रहाचे विमोचन

05 Dec 2025 12:45:42
नागपूर,
Kishore Paunikar नर्मदाष्टकातील प्रत्येक शब्दातील अद्भुत व्यापकता, त्यातील अध्यात्मिक सूक्ष्मता आणि नदीविषयक पर्यावरणपूरक दृष्टिकोन उलगडणाऱ्या लेखमालांचे संकलन असलेली नर्मदाभक्त किशोर पौनीकर लिखित ‘तरंगभंग रंजितम्’ या पुस्तिकेचे प्रकाशन आसाम येथील राष्ट्र सेविका समितीच्या क्षेत्रीय कार्यवाहिका लीलावती कुसरे यांच्या हस्ते करण्यात आले.
 
Kishore Paunikar
 
किशोर पौनीकर यांच्या षष्ट्यब्दीपूर्ती कार्यक्रमानिमित्त हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाची सुरुवात गंगास्तोत्र व नर्मदाष्टक पठण करत सप्तसरितांचे पूजन करून झाली. Kishore Paunikar त्यानंतर झालेल्या प्रकाशन समारंभाला पुण्याहून आलेल्या नर्मदाभक्त यशश्री तावसे, विश्वास तावसे तसेच नाशिकहून आलेले प्रभाकर पाठक हे विशेष उपस्थित होते.
 
कार्यक्रमाच्या प्रारंभी लीलावती कुसरे यांना बालाघाट येथील ‘इतिहास एवं पुरातत्व शोध संस्थान’ तर्फे बहाल झालेल्या मानद ‘साहित्य वाचस्पती’ (डॉक्टरेट) पदवीबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला. Kishore Paunikar नर्मदाष्टक उपासना मंडळ आणि पौनीकर परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जयेंद्र पौनीकर यांनी केले, तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पुण्यातील नर्मदाभक्त मीना कारिया यांनी केले. आभार प्रदर्शन वीरेंद्र पौनीकर यांनी प्रस्तावित केले. धंतोली येथील देवी अहिल्या मंदिरात झालेल्या या सोहळ्याला नागपूरसह महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशातील मोठ्या संख्येने नर्मदाभक्त उपस्थित होते.
सौजन्य: किशोर पौनीकर, संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0