नागपूर
Shivaswaroop Premier League नागपूर शहरातील तरुणाईच्या खेळभावनेला, एकजुटीला आणि मैत्रीच्या नात्यांना नवे बळ देणारी SPL शिवस्वरूप प्रीमियर लीग – सत्र ०३ (२०२५) ही एकदिवसीय भव्य क्रिकेट स्पर्धा रविवार, ७ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ७ वाजल्यापासून हनुमान मंदिर, बाबुलबन ग्राउंड, आंबेडकर चौक जवळ, सी.ए. रोड, नागपूर येथे उत्साहात पार पडणार आहे. या स्पर्धेचे आयोजन शिवस्वरूप बहुद्देशीय संस्था, नागपूर अंतर्गत शिवस्वरूप ढोल-ताशा व ध्वज पथकाच्या वतीने करण्यात आले आहे. संस्थेच्या एकूण १८० सदस्यांपैकी ६६ खेळाडू या स्पर्धेत प्रत्यक्ष खेळण्यासाठी मैदानात उतरतील.

या स्पर्धेत एकूण ६ संघांचा सहभाग असून २ गटांत विभागून ९ सामने खेळवले जाणार आहेत आणि त्यातून फक्त एका संघाला विजेतेपदाचा मान मिळणार आहे. रायगड वॉरियर्स, राजगड रॉयल्स, प्रतापगड पँथर्स, सिंहगड फायटर्स, शिवनेरी सुपर आणि तोरणा टायटन्स हे सहा संघ या चुरशीच्या लढतीत सहभागी होत आहेत. Shivaswaroop Premier League छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणेतून आणि त्यांच्या गडकिल्ल्यांच्या स्मरणार्थ सर्व संघांना किल्ल्यांची नावे देण्यात आली असून, गड-संस्कृती घराघरात पोहोचावी आणि आपला ऐतिहासिक वारसा पुढील पिढीपर्यंत जपला जावा या उद्देशाने ही संकल्पना साकारण्यात आली आहे. स्पर्धेचा अंतिम निकाल त्याच दिवशी सायंकाळी ५ वाजता जाहीर करण्यात येणार आहे.
ही स्पर्धा शिवस्वरूप संस्थेच्या उपक्रमांतर्गत आयोजित असून विजेता व उपविजेता संघाला ट्रॉफी व मेडल्स, तसेच मॅन ऑफ द टूर्नामेंट, बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर आणि बेस्ट ऑलराउंडर अशी वैयक्तिक पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे. Shivaswaroop Premier Leagueविशेष म्हणजे या स्पर्धेत सहभागी होणारे सर्व खेळाडू नागपूर शहरातीलच असून वर्षभर सामाजिक, सांस्कृतिक व सेवा कार्यात सक्रिय असणाऱ्या सदस्यांसाठी हा एक दिवस फक्त मनोरंजन, मैत्री, खेळभावना आणि एकजुटीचा उत्सव ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.