उद्या गडकरींच्या हस्ते पूर्ती सुपर बाजारचे उद्घाटन

    दिनांक :05-Dec-2025
Total Views |
वर्धा,
inaugurate purti super bazaar नागपूरचा नंबर १ चा सुपर बाजार ‘पूर्ती’चे वर्धेत शनिवार ६ रोजी सायंकाळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.पूर्ती बझार ना. नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली २५ वर्षांपूर्वी सुरू करण्यात आला. पूर्तीची एक मोठी श्रृंखला तयार करून त्यातून प्रत्यक्ष रोजगार निर्मिती बरोबरच लघु व गृह उद्योगांना प्रोत्साहन देऊन अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती करणे व वन स्टॉप वन शॉप डेस्टिनेशन असा सुपर बझार उभारणे ही पूर्तीची उद्दीष्ट्ये आहेत.
 

पूर्ती सुपर बाजार  
 
विदर्भा बाहेरच्या पहिल्या पूर्ती सूपर बझारच्या शाखेचे वर्धेत उद्घाटन होत आहे. ६ हजार ८०० स्क्वे. फुटपेक्षा मोठ्या जागेत युरीच मॉल नागपूर रोड येथे नवीन शाखेचे उद्घाटन होणार आहे. कार्यक्रमाला महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. पूर्ती सुपर बझारमध्ये किराणा, क्रॉकरी, स्टेशनरी, कॉस्मेटिस, भेटवस्तू आदी उत्पादनांची प्रचंड रेंज असणार आहे, याशिवाय तांदूळ महोत्सव, धान्य महोत्सव, आंबा महोत्सव, सणा सुदीला खरेदीवर विशेष स्किम राहणार आहे.inaugurate purti super bazaar या कार्यक्रमाला वर्धेकरांनी उपस्थित राहावे असे आवाहन पूर्ती सुपर बझारचे अध्यक्ष रविंद्र बोरटकर, सचिव राजीव हडप, दीपक सप्तर्षी, संदीप जाधव, संचालक केतकी कासखेडीकर व संचालक मंडळ यांनी केले आहे.