नागपूर,
Vishwa Hindu Parishad विश्व हिंदू परिषदेच्या मंदिर एवं अर्चक–पुरोहित संपर्क आयामतर्फे विदर्भ प्रांताचा निवासी अभ्यासवर्ग ६ व ७ डिसेंबर रोजी नागपूर येथे आयोजित करण्यात आला आहे. हा अभ्यासवर्ग सीताबर्डी येथील माहेश्वरी भवन येथे पार पडणार आहे. या वर्गाला अखिल भारतीय मंदिर आयाम संपर्क प्रमुख अरुण नेटके आणि क्षेत्र संपर्कप्रमुख अनिल सांबरे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. उद्घाटन सत्रात विश्व हिंदू परिषदेचे प्रांत संघटन मंत्री विष्णू देशमुख मंदिर आयामाचे कार्य व परिषद कार्याची माहिती देणार आहेत.
७ डिसेंबर रोजी विश्व हिंदू परिषदेचे क्षेत्र सहमंत्री अनंत पांडे यांच्या उपस्थितीत अभ्यासवर्गाचा समारोप होईल. “मंदिर समाजजीवनाचे केंद्र बनावे” या उद्देशाने या अभ्यासवर्गात विविध विषयांवर चिंतन आणि मार्गदर्शन केले जाणार आहे. Vishwa Hindu Parishad विदर्भातील सर्व जिल्ह्यांमधून तसेच नागपूर महानगरातून शंभरहून अधिक निवडक स्त्री-पुरुष कार्यकर्ते या निवासी अभ्यासवर्गात सहभागी होणार आहेत.
सौजन्य: आशिष घाटे, संपर्क मित्र