चंद्रपूर,
Bhandarpur gun arrests,बल्लारपूर शहरात देशी बनावटीचे लोखंडी अग्निशस्त्र (देशी कट्टा) बाळगून फिरत असलेल्या एका व्यक्तीला चंद्रपूर येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून अटक केली. शुक्रवार, 5 डिसेंबर रोजी पेपर मिलच्या न्यू कॉलनीतील आटा चक्कीजवळ ही कारवाई करण्यात आली. राहुल दिनेश डंगोरे (39, रा. पंडित दीनदयाल वॉर्ड, बल्लारपूर) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
पोलिस पथकाने आरोपीच्या ताब्यातून देशी बनावटीची लोखंडी बंदूक जप्त केली असून, तिची अंदाजे किंमत 5 हजार रुपये आहे. या प्रकरणी बल्लारपूर पोलिस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियमाच्या कलम 3 व 25 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.ही कारवाई पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात सहायक पोलिस निरीक्षक दीपक काँक्रेडवार, बलराम झाडोकर, स्वामीदास चालेकर, किशोर वैरागडे, अजय बांगेसर, गोपीनाथ नरोटे, शेखर माथनकर, ऋषभ बारसिंगे यांनी केले. पुढील तपास बल्लारपूर पोलिस करीत आहे.
तर दुसर्या घटनेत 5 डिसेंबर रोजी बल्लारपूर पोलिस गस्तीवर असताना रेल्वे नगर वार्डातील इसम नवाब शेख हा आपल्या राहत्या घरी अवैधरित्या अग्नीशस्त्र बाळगून असल्याची माहिती मिळाली. माहितीच्या आधारे पोलिस निरीक्षक बिपीन इंगळे यांनी आपल्या सहकार्यांसह मोहम्मद इस्माईल उर्फ नवाब युसुफ शेख (30, रा. रा. रेल्वेनगर वार्ड, बल्लारपूर) याच्या घराची झडती घेतली असता देशी बनावटीचे अग्निशस्त्र व 2 नग पितळी धातुचे जीवंत काडतूस आढळून आले. आरोपीवर भारतीय हत्यार कायदा कलम 3, 25 अन्वये गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.ही कारवाई पोलिस निरीक्षक बिपीन इंगळे, सहायक पोलिस निरीक्षक मदन दिवटे, शब्बीर पठाण, रणविजय ठाकुर, पोलिस हवालदार सुनील कामतकर, पुरूषोत्तम चिकाटे, सत्यवान कोटनाके, संतोष दंडेवार, विकास जुमनाके, शरदचंद्र कारूष, खंडेराव माने, गुरू शिंदे आदींनी केली. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक शब्बीर पठाण करीत आहेत.