अमरावतीत कुंटणखाण्यावर धाड

06 Dec 2025 19:49:30
अमरावती,
amravati-raid-prostitution : वलगाव कांमुजा रोडवरील वरवाड येथील कुंटणखाण्यावर अमरावती शहर गुन्हे शाखेची पथकाने शनिवारी दुपारी धाड टकाली. या कारवाईत एक महिला, तीन तरुणींसह दोन तरुण ताब्यात घेण्यात आले. काही आक्षेपार्ह साहित्य जप्त करण्यात आले.
 

AMT 
 
गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संदिप चव्हाण यांना माहिती मिळाली होती की, वलगाव पोलिस स्टेशन हद्दीतील कांमुजा रोडवरील वरवाड येथील एका घरामध्ये एक महिला ही आपल्या आर्थिक फायद्यासाठी लोकांना घरी बोलावून देहव्यापार करीत आहे. त्या आधारावर पथकाने सदर ठिकाणी धाड टाकली असता देहव्यापार चालविणार्‍या महिलेसह ३ तरूणींना व २ ग्राहकांना ताब्यात घेण्यात आले. येथून आक्षेपार्ह वस्तू तसेच इतर साहीत्य जप्त करण्यात आले. या प्रकरणी वलगाव येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुंटणखाना चालविणार्‍या आरोपींकडून माहीती घेतली असता हा प्रकार गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असल्याचे समोर आले. आरोपींच्या मोबाईल क्रमांकाची पडताळणी करून त्यांना मदत करणार्‍या व त्यांचेकडे ग्राहक म्हणून जाणार्‍या इसमांची गुन्हे शाखे कडून चौकशी करण्यात येणार आहे. पोलिसांनी नागरिकांना आवाहन आहे की, अमरावती शहरात अशा प्रकारे कुंटणखाना किंवा वेश्या व्यवसाय कोठे चालू असल्यास तात्काळ माहीती द्यावी. माहीती देणार्‍यांचे नाव गोपिनय ठेवण्यात येईल. सदरची कामगिरी पोउनि गजानन सोनुने, दिपक सुंदरकर, सचिन बाहाळे, जहीर शेख, अतुल संभे, निखील गेडाम, राजीक रायलीवाले, संदीप खंडारे, वर्षा घोंगडे यांनी केली.
 
 
हॉटेल रिच गार्डनमध्ये कुंटणखाना
 
 
पोलिस निरीक्षक संदीप चव्हाण यांनी गुन्हे शाखेच्या पथकासह केलेल्या कारवाईमध्ये नांदगाव पेठ पोलिस स्टेशन हद्दीतील अमरावती - नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल रिच गार्डन येथे असलेल्या रूममध्ये हॉटेल मालक राज सुनील साहू (वय ३५ वर्ष रा. मसानगंज) व प्रवीण किसनराव धुर्वे (वय ३२ वर्ष रा. महात्मा फुले नगर) हे अवैधरित्या कुंटणखाना चालवीत असल्याचे आढळून आले. दोघांसह दलाला व एका परप्रांतीय महिलेस ताब्यात घेण्यात आले.
Powered By Sangraha 9.0