मित्राच्या लग्नाला निघालेली लष्करी जवानांचा अपघातात मृत्यू

06 Dec 2025 12:24:27
नवी दिल्ली,
Army personnel die in accident हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यात भीषण अपघातात दोन लष्करी जवानांचा मृत्यू झाला. मंडीहून निघालेली किआ सोनेट कार तब्बल ६०० मीटर खोल दरीत कोसळली आणि त्यात दोन्ही जवानांचा जागीच मृत्यू झाला. हे दोघेही आपल्या मित्र अमरच्या लग्नाला जाण्यासाठी ब्रेगन गावाकडे रवाना झाले होते. दोन वाहनांमध्ये निघालेल्या ग्रुपपैकी ही कार मागून येत होती.
 

jawan thaer 
मृतांमध्ये ३२ वर्षीय नितेश आई महेंद्र यांचा समावेश आहे. दुसऱ्या वाहनातील मित्रांनी सांगितले की ते संध्याकाळी ६ वाजता मंडीहून निघाले होते. रात्री सुमारे ८.१५ वाजता डार्लॉगजवळ पोहोचल्यावर मागे येणारी कार दिसेनाशी झाली. वारंवार फोन केल्यानंतरही प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी एका महिलेने फोन उचलून त्यांना गाडी दरीत कोसळल्याची माहिती दिली. घाबरलेले मित्र तात्काळ गाडी वळवून घटनास्थळी पोहोचले. दरीत उतरताच दोन्ही जवानांचे मृतदेह गाडीच्या बाहेर पडलेले दिसले. अपघात इतका भीषण होता की दोघांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी २८ वर्षीय कीर्तिमान (गाव बनियाड) यांच्या निवेदनावरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. पोलिसांनी चालक नितेशविरुद्ध निष्काळजीपणे वाहन चालवल्याचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
Powered By Sangraha 9.0