वाशीम,
Mahaparinirvan Din भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज, ६ डिसेंबर रोजी सकाळी साडे पाच वाजता कॅन्डलमार्च काढून महामानवाला आंबेडकर अनुयायांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील पुतळ्यासमोर एकत्र येवून अभिवादन केले. या कॅन्डलमार्च रॅलीची परंपरा गेल्या १९ वर्षापासून वाशीम शहरात जोपासल्या जात आहे.
सर्वप्रथम भन्ते प्रज्ञापाल यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करून त्रिशरण पंचशिल घेण्यात आले. तसेच विविध मान्यवरांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना देण्यात आली. या सदरील कार्यक्रमास शहरातील प्रत्येक नगरातून हातात कॅन्डल घेऊन आंबेडकरी अनुयायी सह परिवार सकाळी साडेपाच वाजता डॉ. बाबासाहेबाना अभिवादन करण्यासाठी हजारोंच्या संख्येने बाबासाहेबाच्या पुतळ्याजवळ आले. या कॅन्डलनी डॉ. आंबेडकर चौकात आकर्षक सजावट करण्यात आली. कार्यक्रमासाठी त्रिरत्न बुध्द विहार चॅरीटेबल ट्रस्ट, वाशीम, भारतरत्न प.पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल अॅटिवा फोरम वाशीम, संघमित्रा धम्मसेवा महिला मंडळ, वाशिम, बौध्द कर्मचारी प्रबोधन मंडळ, वाशीम, बौध्द युवा संघ, वाशीम, जंबुद्विप संघ वाशीम, समता सैनिक दल वाशीम, सिद्धार्थ नवयुवक मंडळ, ढवळेवाडी वाशीम, भारतीय बौध्द महासभा, मंगलमैत्री महिला मंडळ, बुध्द विहार समन्वय महासंघ, भिमनगर बुध्द विहार समन्वय समिती, अकोला नाका बुध्द विहार समन्य समिती, समता नगर, वाशीम तथा समस्त बौध्द बांधव वाशीम यांनी परिश्रम घेतले.