आधुनिक युद्धात ड्रोनला महत्त्वाचे स्थान : विंग कमांडर दीपिका राव

06 Dec 2025 15:14:13
वर्धा,
deepika rao in wardha शत्रूची अचूक माहिती मिळवणे, शत्रूचे जास्तीत जास्त नुकसान करून आपल्या सैनिकांची जीवितहानी टाळणे व शत्रूंवर आक्रमण करण्याकरिता ड्रोनचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे एनसीसी अधिकारी, सैन्य दलातील अधिकारी व प्रशिक्षक तसेच एनसीसी छात्र सैनिकांना ड्रोनचा वापर करता येणे गरजेचे आहे. आधुनिक युद्धात ड्रोनला महत्वाचे स्थान असल्यामुळे प्रशिक्षण आवश्यक आहे, असे प्रतिपादन २ महाराष्ट्र एअर स्कॉड्रर्न एनसीसीच्या कमान अधिकारी विंग कमांडर व्हि. दीपिका राव यांनी केले.
 

दीपिका राव  
 
 
नुकत्याच संपन्न झालेल्या एनसीसी ड्रोन ट्रेनर प्रशिक्षण शिबिराच्या समारोपप्रसंगी नागपूर ग्रुप मुख्यालय येथील युवा शक्ती भवनात त्या बोलत होत्या. नागपूर ग्रुप मुख्यालयाचे ग्रुप कमांडर ग्रुप कॅप्टन खुशाल व्यास यांच्या मार्गदर्शनाखाली दहा दिवसीय ड्रोन ट्रेनर प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात २७ अधिकारी व सैन्य दलाचे प्रशिक्षकांचा समावेश असून त्यांना एअर मेंटेनन्स मुख्यालयाच्या मैदानावर ड्रोनचे प्रशिक्षण देण्यात आले. ड्रोनचे प्रशिक्षक म्हणून एनसीसीचे फ्लाईंग ऑफिसर हरीश कुटेमाटे व ऐरो माडेलिंग इन्स्ट्रटर हर्षद कडवे यांनी प्रशिक्षण दिले. प्रशिक्षणार्थ्यांमध्ये प्रामुख्याने २ महाराष्ट्र आर्टिलरी एनसीसी युनिटचे कमान अधिकारी लेफ्टनंट कर्नल अमेय कानडे, ३ महाराष्ट्र गर्ल्स बटालियनच्या पूर्णवेळ एनसीसी अधिकारी मेजर ममता शंकर, २१ महाराष्ट्र एनसीसी बटालियनचे एनसीसी अधिकारी कॅप्टन मोहन गुजरकर, लेफ्टनंट योगेश टेकाडे, ३ महाराष्ट्र गर्ल्स बटालियनच्या कॅप्टन पौर्णिमा चुटे यांचा समावेश होता.deepika rao in wardha ड्रोनचे ट्रेनर म्हणून प्रशिक्षण पूर्ण झालेले असून सदर टीम नागपूर विभागातील एनसीसी छात्र सैनिकांना तसेच एनसीसी अधिकार्‍यांना प्रशिक्षण देणार आहेत. २०२६ पासून स्थल सेना, वायुसेना व नौदल शिबारांमध्ये ड्रोन वापरण्याचे तंत्र यावर राष्ट्रीय स्तरावर स्पर्धांचे आयोजन केले जाणार आहे. ज्यात एनसीसी छात्र सैनिक सहभागी होणार आहेत. ड्रोन वापरण्याच्या तंत्रात उत्कृष्ट छात्र सैनिकांना राष्ट्रीय स्तरावरील शिबिरामध्ये सहभागी केले जाणार आहे.
Powered By Sangraha 9.0