वॉशिंग्टन,
FIFA World Cup 2026 २०२६ च्या फिफा विश्वचषकासाठी गट जाहीर करण्यात आले आहेत. हा विश्वचषक संयुक्तपणे अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिकोमध्ये होणार असून ४८ संघ सहभागी होतील, ही इतक्या संघांची पहिलीच स्पर्धा असेल. फिफा विश्वचषक ११ जून २०२६ रोजी सुरू होईल आणि अंतिम सामना १९ जुलै रोजी न्यू जर्सीतील मेट लाईफ स्टेडियमवर होईल. ड्रॉ समारंभ हॉलिवूड स्टार्स टॉम ब्रॅडी, शाकिल ओ'नील, आरोन जज आणि वेन ग्रेट्स्की यांच्या उपस्थितीत पार पडला.
अद्याप सहा संघांची पात्रता ठरलेली नाही, जे इंटरकॉन्टिनेंटल प्लेऑफद्वारे ठरवली जाणार आहे. यामध्ये जॉर्डन, केप व्हर्डे, कुराकाओ आणि उझबेकिस्तानचे संघ पहिल्यांदाच खेळणार आहेत. स्टार फुटबॉलपटूंच्या गटांबाबत, क्रिस्टियानो रोनाल्डोचा पोर्तुगाल संघ गट के मध्ये असून, लिओनेल मेस्सीचा अर्जेंटिना संघ गट जे मध्ये आहे. कायलियन एमबाप्पेचा फ्रान्स आणि एर्लिंग हालांडचा नॉर्वे गट आय मध्ये स्थान देण्यात आले आहे, त्यामुळे पुढील वर्षी या स्टार खेळाडूंमध्ये रोमांचक सामने पाहायला मिळू शकतात. फिफा विश्वचषकात ४८ संघांपैकी कोण विजयी ठरेल, हे काळाच सांगेल, परंतु रोनाल्डो, मेस्सी, एमबाप्पे आणि हालांड यांसारख्या स्टार खेळाडूंच्या सामन्यांसाठी चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.
२०२६ च्या फिफा विश्वचषकातील गट पुढीलप्रमाणे आहेत:
गट अ: मेक्सिको, दक्षिण आफ्रिका, दक्षिण कोरिया, एक संघ पात्र
गट ब: कॅनडा, कतार, स्वित्झर्लंड, एक संघ पात्र
गट क: ब्राझील, मोरोक्को, हैती, स्कॉटलंड
गट ड: अमेरिका, पॅराग्वे, ऑस्ट्रेलिया, एक संघ पात्र
गट ई: जर्मनी, कुराकाओ, आयव्हरी कोस्ट, इक्वेडोर
गट फ: नेदरलँड्स, जपान, ट्युनिशिया, एक संघ पात्र
गट ग: बेल्जियम, इजिप्त, इराण, न्यूझीलंड
गट ह: स्पेन, केप वर्दे, सौदी अरेबिया, उरुग्वे
गट १: फ्रान्स, सेनेगल, फिफा प्लेऑफ २, नॉर्वे
गट जे: अर्जेंटिना, अल्जेरिया, ऑस्ट्रिया, जॉर्डन
गट के: पोर्तुगाल, फिफा प्लेऑफ १, उझबेकिस्तान, कोलंबिया
गट ल: इंग्लंड, क्रोएशिया, घाना, पनामा