नागपूर,
Dighori area दक्षिण नागपूर येथील दिघोरी रिंग रोड परिसरातील एका दुकानाला आज दुपारी अचानक आग लागली. या दुकानात बॅटरी दुचाकीची विक्री केली जात होती, आणि आगीत सुमारे सहा दुचाक्या जळून खाक झाल्या. परिसरातील नागरिकांच्या माहितीनुसार, आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचे दिसते. या आगीमुळे परिसरात काळा धूर उडाला आणि नागरिकांमध्ये मोठी गर्दी झाली. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
सौजन्य: अंशुल जिचकार, संपर्क मित्र