गोंदिया,
Muskan Sakhare death, पहाटेच्या सुमारास मॉर्निंग वॉकसाठी घरून निघालेल्या युवतीचा अज्ञात वाहनाच्या धडकेत जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवार ६ डिसेंबर रोजी पहाटे ५.३० वाजताच्या सुमारास गोरेगाव तालुक्यातील नोनीटोला/सोनी गाव शिवारात घडली. मुस्कान साखरे (१७) रा. नोनीटोला असे मृत युवतीचे नाव आहे.
मुस्कान ही अकराव्या वर्गात अध्ययनरत होती. दरदिवशी गोरेगाव-आमगाव मार्गावर मॉर्निंग वॉकला जायची दरम्यान, घटनेच्या वेळी नेहमी प्रमाणे ती सकाळी फिरण्यासाठी गेली असता गाव तलावाजवळ गोरेगावकडून आमगावच्या दिशेने जाणार्या अज्ञात वाहन चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन भरधाव वेगात चालवून तिला धडक दिली. या धडकेत तिचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती गोरेगाव पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविले. मॉर्निंगवॉकला जाणार्या काही गावकर्यांच्या मते मुस्कानला बोलेरो वाहनाने धडक दिल्याचे सांगण्यात येत आहे. गोरेगाव पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास कार्याला सुरुवात केली असून चारचाकी वाहनाचा शोध सुरू आहे.