तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
health-marathon : कॉटन सिटी रनर्स फाउंडेशन, अॅथलेटिक असोसिएशन, जिल्हा पोलिस दल, जिल्हाधिकारी कार्यालय, शहरातील विविध क्रीडा संघटना, आयएमए आणि श्रमिक पत्रकार संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने हेल्थ मॅरेथॉनची 4 थी आवृत्ती 4 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आली आहे.
या मॅरेथॉनचा मुख्य उद्देश जनमानसामध्ये व्यायामाची, फिटनेसची आणि आरोग्याची सवय रुजवणे व प्रत्येक नागरिकाला निरोगी जीवनशैलीकडे प्रवृत्त करणे हा आहे. ही मॅरेथॉन 2023 साली जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या पुढाकारातून सुरू झाली. सुरुवातीपासूनच या मॅरेथॉनने एक वेगळी ओळख मिळवून दिली आहे. दरवर्षी यात सहभागी होणाèया धावकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे.
मागील वर्षी जवळपास 3000 धावक सहभागी झाले होते. यावर्षीही इतकीच किंवा त्याहून जास्त संख्या अपेक्षित आहे. देशभरातून मॅरेथॉन रनर्स, अल्ट्रा रनर्स, कॉम्रेड्स रनर्स या स्पर्धेत सहभागी होत आहेत. कॉटन सिटी रनर्स फाउंडेशनतर्फे आम्ही सर्व यवतमाळकर, क्रीडा प्रेमी, सामाजिक संघटना, महिला रनर्स, युवक, तसेच प्रत्येक नागरिकांना यात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.