यवतमाळमध्ये प्रथमच आंतरराष्ट्रीय बुद्धीबळ स्पर्धा

06 Dec 2025 19:58:52
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, 
international-chess-tournament : जिल्ह्यात प्रथमच आंतरराष्ट्रीय खुली फिडे रॅपिड रेटिंग बुद्धिबळ स्पर्धा रविवार, 14 डिसेंबर आयोजित होत असून, पोदार इंटरनॅशनल स्कूल, यवतमाळ येथे ही एकदिवसीय भव्य स्पर्धा पार पडणार आहे. ही स्पर्धा पोदार प्रेप दर्डा नगर आणि पोदार इंटरनॅशनल स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येत आहे. या विशेष आयोजनामागील मुख्य प्रेरणास्थान आंतरराष्ट्रीय दर्जाचे बुद्धिबळपटू श्रेेयस निकम आहेत. त्यांच्या पुढाकारामुळे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धेचे यजमानपद यवतमाळला मिळाले आहे.
 
 
CHESS
 
 
 
स्पर्धेला महाराष्ट्र बुद्धीबळ संघटना आणि अखिल भारतीय बुद्धीबळ महासंघ यांची अधिकृत मान्यता मिळाल्याने स्पर्धेचे महत्त्व अधिक वाढले आहे. या आयोजनात अ‍ॅड. जीवन पाटील, मोहन केळापूरे, गिरीश जोशी, विवेक बोगावर व अरविंद गाबडा यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
 
 
स्पर्धेची घोषणा होताच जिल्ह्यातील बुद्धिबळप्रेमी व तरुण खेळाडूंमध्ये प्रचंड उत्सुकता आणि उत्साह निर्माण झाला आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाची स्पर्धा आपल्या जिल्ह्यात अनुभवण्याची ही सुवर्णसंधी असल्याचे सर्व स्तरांतून सांगितले जात आहे. या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन भूषण श्रीवास, श्रेेयस निकम, प्रफुल चपाते, सरथ बाबू, मनीषा आकरे, सारिका शर्मा, मंजिरी निकम, विरेन घुइखेडकर यांनी केले आहे.
Powered By Sangraha 9.0