बच्चन कुटुंबावर ‘बॉयकॉट’ची धमकी

06 Dec 2025 11:27:30
मुंबई,
Jaya Bachchan controversy अभिनेत्री आणि राज्यसभा खासदार जया बच्चन यांचा पॅपाराझींशी असलेला मतभेद हा नवा विषय नाही. सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये पॅपाराझी कॅमेरे पाहिले की जया बच्चन यांचा राग उफाळून येतो, त्याबरोबरच त्यांची शब्दांची चक्रधर मालिका सुरू होते, हे अनेक वेळा पाहायला मिळालं आहे. परंतु अलीकडेच एका कार्यक्रमात केलेल्या विधानामुळे हा वाद आणखी चिघळला आहे. यावेळी त्यांनी पॅपाराझींना ‘उंदीर’, ‘घाणेरडी पँट घालणारे’ अशा शब्दांत हिणवले. पॅपाराझींसोबतचा आपला ‘शून्य’ संबंध असल्याचे त्यांनी जाहीरपणे सांगितले. त्यांच्या या विधानानंतर आतापर्यंत दुर्लक्षाची भूमिका घेणारे पॅपाराझी मात्र टोकाच्या संतापात आले असून त्यांनी बच्चन कुटुंबावरच बहिष्कार घालण्याची धमकी दिली आहे.
 
 

Jaya Bachchan controversy 
पॅपाराझींनी जया बच्चन यांच्या विधानाविषयी रोष व्यक्त करताना काही मुद्देही उपस्थित केले. “दर रविवारी जेव्हा अमिताभ बच्चन आपल्या चाहत्यांना भेटतात, तेव्हा आम्हीच त्यांचं कव्हरेज करतो. जया बच्चन यांच्या नातू अगस्त्य नंदाच्या ‘इक्कीस’ चित्रपटाचे प्रमोशनल कव्हरेज कोण करणार?” असा सवाल पॅपाराझींच्या एका गटानं उपस्थित केला.
विरल भयानीच्या टीममधील एका सदस्याने जया बच्चन यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना सांगितलं, “आम्ही कधीही कोणत्याही सेलिब्रिटींचा गैरवापर केलेला नाही. आम्हालाही आमच्या कामाची जाणीव आहे. आम्हीही माणसंच आहोत.” त्याचबरोबर त्यांनी सेलिब्रिटींच्या गोपनीयतेचा आदर करण्याचा प्रयत्न नेहमीच होत असल्याचेही नमूद केले.
 
 
प्रसिद्ध फोटोग्राफर Jaya Bachchan controversy मानव मंगलानी यांनीही जया बच्चन यांच्याविषयी आदर व्यक्त करताना सांगितलं, “कदाचित त्या डिजिटल युगातल्या नाहीत. त्यांच्या मुलांनी किंवा नातवंडांनी त्यांना बदलत्या काळाची जाणीव करून देणं गरजेचं आहे.” त्यांनी पुढे स्पष्ट केले की, आजकाल युट्यूबर्स आणि मोठ्या फॉलोअर्स असलेले कंटेंट क्रिएटर्स कोणत्याही मर्यादा न पाळता सेलिब्रिटींच्या मागे लागतात, ज्यामुळे संपूर्ण फील्डवरच कलंक येतो. “हे अनैतिक आहे आणि तातडीने थांबवायला हवं,” असं मंगलानी म्हणाले.
 
 
वरिंदर चावला यांनीही जया बच्चन यांच्या वक्तव्याची नोंद घेत म्हटलं की, पॅपाराझी नेहमीच सेलिब्रिटींच्या विनंतीचा आदर करतात. “रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोण यांनी त्यांच्या मुलांचे फोटो काढू नये अशी विनंती केली होती, आणि आम्ही त्यांचा आदर करत ते फोटो घेतले नाहीत. 2023 मध्ये मी अमिताभ बच्चन यांचा एक व्हिडिओ त्यांच्या पीआर टीमच्या विनंतीनुसार पोस्ट केला नव्हता. आम्ही नेहमीच आदर ठेवला आहे,” असं चावला म्हणाले. त्यांनी पुढे सांगितले की, “जयाजींनी सगळ्यांनाच एकाच तराजूत तोलणं योग्य नाही. काही जण चुकीचे असतील, पण त्याचा ठपका संपूर्ण फोटोग्राफर समुदायावर लावणं अन्यायकारक आहे.”चावला यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना जया बच्चन यांच्यापासून ‘दुरावा’ ठेवण्याचा सल्ला दिला आहे. “जिथे आपल्याला आदर नाही, तिथे आपण कव्हरेज का द्यावं? आमच्यातील अनेक जण बच्चन कुटुंबाला बायकॉट करण्याच्या भूमिकेत आहेत,” असे ते म्हणाले.या सर्व घडामोडींमुळे जया बच्चन यांची पॅपाराझींवरील टीका पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. आता या वादाचा शेवट कुठे होतो, आणि बच्चन कुटुंबावर पॅपाराझींच्या बहिष्काराचा प्रत्यक्ष परिणाम किती पडतो, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.
Powered By Sangraha 9.0