हरवलेली दीड लाखाची पर्स केली परत!

06 Dec 2025 19:13:17
पुलगाव,
Lost purse returned : कृषी उत्पन्न बाजार समितीजवळ १ लाख ५० हजार रुपये किमतीचा ऐवज असलेली पर्स रस्त्यावर पडलेली असताना महेश पनपालिया आणि विकास मुंजेवार या दोन तरुणांनी ती प्रामाणिकपणे परत करून माणुसकीचे दर्शन घडवले आहे. ग्रामीण भागात अजुनही माणुसकी जिवंत असल्याचे हे ताजे उदाहरणच म्हणावे लागेल.
 
 
JK
 
मिळालेल्या माहितीनुसार नाचणगाव येथील शितल बोरेकर पती आणि मुलीसोबत सकाळी ९ वाजता मोटारसायकलने नाचनगावहून आर्वीला जात असताना स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समिती पुढे त्या महिेलेची पर्स रस्त्यावर पडली. या पर्समध्ये सोन्याची पोत, कानातील रिंग, रोख ४०० रुपये आणि मोबाईल असा जवळपास १ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज होता. शेतात जात असलेले महेश पनपालिया आणि विकास मुजेंवार यांना ती पर्स दिसली. त्यांनी ती उचलून सुरक्षित ठेवली. जवळपास एक तासानंतर पर्स हरवून भांबावलेल्या महिलेने आपल्या मोबाईलवर संपर्क केला असता महेश यांनी तुमची पर्स आपल्याकडे सुरक्षित असल्याचे सांगितले. त्यानंतर महेश पनपालिया आणि विकास मुजेंवार यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी वंदना कारखेडेे यांच्याकडे ती पर्स जमा केली. उपविभागीय अधिकार्‍यांनी ती पर्स संबंधित महिलेला सुपूर्द केली. प्रामाणिकपणाचे उदाहरण घालून दिल्याबद्दल उपविभागीय अधिकारी वंदना कारखेले यांनी पनपालिया आणि मुंजेवार यांचे अभिनंदन केले.
Powered By Sangraha 9.0