तभा वृत्तसेवा
पुसद,
matoshree-school : राज्य विज्ञान संस्था नागपूर, शिक्षण विभाग पंचायत समिती पुसद, विज्ञान व गणित मंडळ पुसद यांच्या संयुक्त विद्यमानाने तालुकास्तर विज्ञान प्रदर्शनी माऊंट लिटरा झी स्कूल, पुसद आयोजित करण्यात आली होती. यामध्ये मातोश्री विद्यालय श्रीरामपूरच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. त्यांच्या दोन प्रतिकृतींची जिल्हास्तर विज्ञानप्रदर्शनीसाठी निवउ करण्यात आली आहे.
या विज्ञान प्रदर्शनात विद्यालयातर्फे सर्वसाधारण गटातून भाविक विनोद राठोड या विद्यार्थ्याने अपघात प्रतिबंधक प्रकल्प, तर दिव्यांग गटातून तुकाराम प्रकाश जगताप याने ड्रायव्हर गार्ड व्हेईकल सेफ्टी सिस्टीम या प्रतिकृतीचे उत्कृष्ट सादरीकरण केले. त्यामुळे या प्रतिकृतीला तालुकास्तर विज्ञान प्रदर्शनात प्रथम क्रमांकाने सन्मानीत करण्यात आले असून त्यांची जिल्हास्तर विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली.
तालुकास्तर विज्ञान प्रदर्शनातील यशस्वी विद्यार्थ्यांना समारोपीय कार्यक्रमांमध्ये मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले असून शाळेच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे. संस्थाध्यक्ष दिगंबर जगताप यांनी भाविक व तुकाराम यांचे आणि त्यांचे आई-वडील, मार्गदर्शक शिक्षक, मुख्याध्यापक यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.