नाईल नदीच्या तळाशी ‘मृत्यूचं शहर’...दोन ममींच्या ‘आलिंगनाने संशोधकही थक्क

06 Dec 2025 13:04:59
कैरो,
Mummies of the Nile River रहस्यांनी वेढलेली ही भूमी जगाला सतत काहीतरी चकित करणारे दाखले देत असते. पुन्हा एकदा असाच थरारक पुरातत्त्वीय शोध समोर आला आहे. असवान शहराजवळील नाईल नदीच्या विशाल पात्रालगतच्या डोंगराळ भागात उत्खनन सुरू असताना संशोधकांना थक्क करणारा नजारा सापडला आहे. इजिप्त आणि इटलीमधील संशोधकांच्या संयुक्त पथकाने केलेल्या या उत्खननात ३० हून अधिक प्राचीन थडगी आढळली. यातील एका दगडी ताबूतामध्ये दोन ममी एकमेकांना आलिंगन केलेल्या अवस्थेत सापडल्यात. या अवस्थेच कारण संशोधकांसाठी मोठ कोड ठरल आहे. त्या कोणाच्या होत्या? त्यांना अशी ‘अलिंगनबद्ध’ स्थिती का दिली गेली? हे अद्यापही अनुत्तरितच आहे. हे ठिकाण काही वर्षांपूर्वी अवैध खोदकामादरम्यान उघडकीस आले होते. त्यानंतर सरकारी नियंत्रणात घेत वैज्ञानिक पद्धतीने संशोधन सुरू करण्यात आले.
 
 
The embrace of two mummies
 
 
या समोर आलेल्या निष्कर्षांनुसार, या कब्रस्तानाचा वापर इ.स.पूर्व ३३२ ते इ.स. ३९५ या काळात, म्हणजे जवळपास ९०० वर्षे, सतत होत होता. आढळलेल्या मृतावशेषांचा अभ्यास करताना एक धक्कादायक बाब पुढे आली. येथील ४० टक्के अवशेष नवजात किंवा दोन वर्षांपेक्षा कमी वयाच्या बालकांचे आहेत. यावरून संशोधकांना असा अंदाज व्यक्त करावा लागला की त्या काळात मोठी महामारी, तीव्र कुपोषण किंवा घातक संसर्गजन्य आजारांचा प्रचंड फैलाव झाला असावा. या उत्खननात सापडलेली दहा मजल्यांसारखी दिसणारी थडग्यांची रचनाही जगभरातील इतिहासतज्ज्ञांना चकित करणारी आहे. या थडग्यांमध्ये तेलाचे प्राचीन दिवे सापडले असून त्यांचा वापर शोकविधींसाठी केला जात असल्याचे संकेत मिळाले आहेत. तर काही ठिकाणी जळलेली माती, रंगीत कापडी गाद्या, लाकडी शवपेट्या आणि बळी देण्याशी संबंधित वस्तू देखील मिळाल्या.
 
 
 
विशेष म्हणजे, या कब्रस्तानात श्रीमंत व गरीब लोकांमध्ये स्पष्ट सामाजिक विभागणी दिसते. गरीब लोकांचे मृतदेह खोल्यांच्या खालच्या भागात दफन केले जात, तर धनिकांसाठी वरच्या भागात खास कक्ष तयार केले जात. काही थडगी मोकळ्या जागेत होती, तर काही डोंगर फोडून तयार करण्यात आली होती. अनेक मृतदेहांमध्ये क्षयरोग (TB), कुपोषण आणि हाडांचे आजार यांचे स्पष्ट संकेत संशोधकांना दिसले आहेत. त्यामुळे एका काळी या परिसरात TB सारख्या रोगाने संपूर्ण कुटुंबांची कुटुंबे नष्ट केली असावीत, असा गंभीर अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. पण त्यातील सर्वात गूढ भाग दोन ममींचे आलिंगन अजूनही उलगडलेले नाही.
 
Powered By Sangraha 9.0