अनाथ मुलांना स्विकारण्याची खरी गरज

06 Dec 2025 20:38:52
नागपूर,
prashant-hartalkar : भारतीय समाज व्यवस्थेत मूल नाकारण्याची, विविध कारणांमुळे मूल रस्त्यावर सोडण्याची मानसिकता असली तरी मूल न होणार्‍या लाखो अनाथ मुलांना स्विकारण्याची खरी गरज आहे. ज्या दिवशी अनाथ मुलांना घेणार्‍यांची संख्या वाढेल, त्या दिवशी खर्‍या अर्थाने स्वनाथ म्हणून आपला समाज विकसित समजल्या जाईल, असा विश्वास रा.स्व. संघाचे जेष्ठ प्रचारक व विश्व मांगल्य सभेचे मार्गदर्शक प्रशांत हरताळकर यांनी व्यक्त केला.
 

NGP 
 
 
 
देवी अहल्याबाई स्मारक समितीच्या वतीने देवी अहल्या मंदिर, धंतोली कै. काकू रानडे व्याख्यानमालेत प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. यावेळी प्रामुख्याने श्रीनिवास वर्णेकर, देवी अहल्याबाई स्मारक समितिच्या अध्यक्ष करूणा साठे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अंजली कुळकर्णी, यामिनी पांडे आदींनी परिश्रम घेतले.
 
दत्तक घेणार्‍यांचे प्रमाण सर्वात कमी
 
 
आपल्या मार्गदर्शनात प्रशांत हरताळकर पुढे म्हणाले, आजच्या घडीला देशात ३ कोटी १० मूल अनाथ असताना केवळ ४ ते ५ हजार मुलांना दत्तक घेतल्या जाते. याशिवाय ५ कोटी ५० लाख भारतीय दांपत्यांना मुल नाहीत. एकीकडे भारतात सर्वाधिक अनाथ मुले असताना दत्तक घेणार्‍यांचे प्रमाण सर्वात कमी आहे. ही अनाथ मुलांची नव्हे तर सामाजिक समस्या आहे. देशभरात एकूण ४ हजार ५५६ अनाथालय असून भारतापेक्षा नागरिक दत्तक घेण्यास समोर येत आहे. मुळात अनाथालय काढण्याची काय गरज आहे, असा प्रश्न निर्माण होतो. सरकारची दत्तक योजना पूर्णत: अयशस्वी ठरल्याचे दिसून येते. प्रत्येक मुलांना आई मिळावी ,यासाठी अकोला येथे विश्व मांगल्य संस्थेच्या मदतीने सर्वेक्षण करण्यात आले होते. यात १३ हजार ७६८ अनाथ मुले आढळून आली. या मुलांच्या अनेकांनी पुढाकार घेण्यास सुरुवात केली आहे. एकीकडे मुलांना अनाथ करण्याचे अमानवीय कृत्य सुरू असले तरी अनाथ झालेल्या अशा मुलांना घरी नेण्यासाठी फार कमी पालक आसुसलेले दिसून येतात.
Powered By Sangraha 9.0