तुला वाढदिवसाच्या पहिल्या आणि शेवटच्या शुभेच्छा...

06 Dec 2025 16:21:19
पुणे,
Police constable Nikhil Randive commits suicide 'तुझा आज पहिला वाढदिवस पण आजच्या दिवशी मला तुझा वाढदिवस चांगल्या प्रकारे करायचा होता, पण मी पोलीस खात्यात नोकरी करतो, वरिष्ठ मला त्रास देत असून मी तुला वेळ देऊ शकत नाही', अशा हळव्या शब्दांत शेवटची चिठ्ठी लिहून एका पोलिस हवलदाराने लेकीच्या पहिल्या वाढदिवशी जीवन संपवले. दौंड तालुक्यातील यवतचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या त्रासाला कंटाळून पोलिस हवालदार निखिल रनदिवे यांनी आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी लिहित बेपत्ता झाले आहे. या घटनेने कुटुंबीय, मित्र परिवार आणि परिसरातील नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

sudise 
दौंड तालुक्यातील यवत पोलिस ठाण्यात खळबळ उडवणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. यवतचे पोलिस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याची भावनिक स्टेटस टाकून पोलिस हवालदार निखिल रणदिवे बेपत्ता झाले आहेत . मिळालेल्या माहितीनुसार, हवालदार निखिल रनदिवे यांची बदली यवतहून शिक्रापूर येथे झाली होती. मात्र, बदली आदेश असूनही पोलिस निरीक्षक नारायण देशमुख यांनी त्यांना कार्यमुक्त करण्यास विलंब केल्याचा आरोप रनदिवे यांनी आपल्या चिट्ठीत केला आहे. या विलंबामुळे आणि वरिष्ठांच्या त्रासामुळेच आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
आज तुझा पहिला वाढदिवस पण आजच्या दिवशी मला तुझा वाढदिवस चांगल्या प्रकारे करायचा होता. पण मी पोलीस खात्यात नोकरी करतो. तिथे वरिष्ठांची मनमानी चालते. तसेच चार पाच दिवसापूर्वी तु आजारी होती. पण मला मुद्दाम नाशिक, जळगाव, अहिल्यानगर येथे कर्तव्य नेमल्यामुळे तुला हॉस्पीटल मध्ये घेऊन जाता आले नाही. यवत पोलीस स्टेशन येथील अधिकारी नारायण देशमुख मला गेली एक वर्षापासून सतत त्रास देत आहे. माझा नाईविलाज आहे. मी माझे जिवाचे बरेवाईट करुन घेत आहे. तुला वाढदिवसाच्या पहिल्या आणि शेवटच्या शुभेच्छा... घटनेनंतर पुणे ग्रामीण पोलिस दलात मोठी हालचाल सुरू झाली आहे. हवालदार रनदिवे यांच्या शोधासाठी विशेष पथक गठित करण्यात आले असून, यवत ते शिक्रापूर परिसरात शोधमोहीम सुरू आहे. दरम्यान, वरिष्ठांकडून छळ झाल्याच्या गंभीर आरोपांमुळे पोलिस विभागातही मोठी चर्चा सुरू असून, घटनेचा तपास करण्यासाठी स्वतंत्र चौकशीची मागणी जोर धरत आहे. हवालदार रणदिवे यांचा शोध लागावा आणि प्रकरणातील सत्य बाहेर यावे, यासाठी त्यांच्या कुटुंबीयांनी प्रशासनाकडे तातडीची मागणी केली आहे. दरम्यान, या संपूर्ण घटनेमुळे पुणे ग्रामीण पोलिस दलात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
Powered By Sangraha 9.0