आचल आणि सक्षमच्या कुटुंबाला पोलीस प्रोटेक्शन!

06 Dec 2025 14:52:19
नांदेड,
Police protection for Achal नांदेडमध्ये आंतरजातीय प्रेमसंबंधातून सक्षम ताटे याची निर्घृण हत्या झाल्यानंतर पोलिसांनी संवेदनशील परिस्थिती लक्षात घेऊन त्याच्या कुटुंबीयांसह प्रेयसी आचल मामीडवार हिला सुरक्षा उपलब्ध करून दिली आहे. या घटनेमुळे दोन्ही कुटुंबांना संभाव्य धोका निर्माण होऊ शकतो, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला होता. त्यानुसार, सक्षमच्या संघसेननगर येथील घराबाहेर सहा शस्त्रधारी पोलीस तैनात करण्यात आले असून दोन-दोन कर्मचाऱ्यांची चार तासांची पाळी ठेवून अखंड सुरक्षा दिली जाणार आहे.
 
 
Police protection for Achal
 
दि. २७ नोव्हेंबर रोजी सक्षम ताटे याची गोळ्या झाडून आणि डोक्यात फरशी टाकून हत्या करण्यात आली होती. पोलिसांच्या तपासानुसार, आंतरजातीय प्रेमसंबंध आढळल्यामुळे मुलीच्या वडिलांनी, भावांनी आणि त्यांच्या साथीदारांनी ही हत्या केली आहे. आचल मामीडवारच्या आई–वडील, दोन्ही भाऊ आणि इतर तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून सध्या ते कोठडीत आहेत. घटनेपूर्वीचा सीसीटीव्ही फुटेजमध्ये आचलच्या एका भावाने मित्रासह सक्षमच्या घराची रेकी करत असल्याचे दिसून आले आहे. या प्रकरणातील एक आरोपी अल्पवयीन असल्यामुळे दोन्ही कुटुंबांसमोर धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याचे पोलिसांनी निदर्शनास आणले. सामाजिक संघटनांच्या मागणीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने तातडीने सुरक्षा यंत्रणा उभारली आहे. सुरक्षा व्यवस्था दिवस-रात्र सतत राखण्यासाठी स्वतंत्र पाळ्या ठेवण्यात आल्या आहेत.
Powered By Sangraha 9.0