रेल्वे कर्मचारी संघाच्या कार्यकारिणीची घोषणा

06 Dec 2025 21:57:27
नागपूर,
railway-employees-union : मध्य रेल्वे कर्मचारी संघ संलग्न भारतीय रेल्वे मजदूर संघाचे द्विवार्षिक अधिवेशन झाले. अधिवेशनात रेल्वे कर्मचारी संघाचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. झोनल महामंत्री म्हणून सागर सिंग तोमर यांची निवड करण्यात आली. अधिवेशनात सी.व्ही.राजेश, संदीप कदम, उमेश महाडिक, शिवप्रसाद साव, मंगेश देशपांडे उपस्थित होते. याप्रसंगी मध्य रेल्वे संघाची कार्यकारिणीची निवड करण्यात आली. नव्या कार्यकारिणीत अध्यक्षपदी मिलिंद झगडे , सागर सिंग तोमर, सूर्यप्रकाश तिवारी, हबीब खान आदींचा समावेश आहे.
 
 

TRAIN 
Powered By Sangraha 9.0