सेलू,
roads-dug-up : चांगले रस्ते फोडून सेलू शहरासाठी पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. यातच हिंगणी गावानजीक गावात जाणार्या मुख्य रस्त्याला खोदण्यात आले. पण, त्याची दुरस्ती कधी होणार याची प्रतीक्षा हिंगणीकरांना आहे.
अमृत योजनेंंतर्गत सेलू तालुयात असणार्या बोरधरण येथून सेलू येथे शुद्ध पेयजल पोहोचवण्यासाठी जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. या जलवाहिनीचे खोदकाम रस्त्याच्या काठाने सुरू असून हिंगणी गावातील मुख्य रस्ता तसेच जलवाहिनीच्या वाटेत येणार्या गावात जाणारे रस्ते फोडण्यात आल्याने चांगल्या रस्त्याची वाट लागली आहे. यातच अमृत योजनेंतर्गत फोडण्यात आलेल्या रस्त्यावरील निघालेली माती त्या खड्ड्यात टाकून बुजविण्यात आल्याचे तेथील नागरिकांचे म्हणने आहे. दररोज या मार्गाने जड वाहनाचे आवागमन होत असल्याने त्याठिकाणी मोठा खड्डा निर्माण झाला आहे. आता परिस्थिती अशी झाली आहे कि खड्डा ओलांडताना कोणत्याही वाहनांना तारेवरची कसरतच करावी लागत आहे.
बाकी रस्ता गुळगुळीत आसल्याने भरधाव वेगाने येणार्या वाहनांना खड्डा दिसून पडत नसल्याने वाहन नियंत्रित करण्याच्या प्रयत्नात तोल सुटतो यामुळे दररोजचे अपघात होत आहेत. रस्ता फोडण्याची ज्याने कुणी परवानगी दिली असेल त्या रस्त्याचे ठेकेदाराला रस्ता पूर्वी जसा होता तसाच करुन देण्याचे का सांगितले नसावे याबाबत गावातील ग्रामपंचायतला कळवून त्यांची परवानगी घेतलेली आहे काय याचाही शोध घेण्यात यावा अन्यथा सदर रस्ता चालन्यासारखाही राहला नसल्याने या रस्ताची दुरुस्ती पूर्वी सारखी कोण तयार करुन देणार याची लेखी हमी द्यावी नंतरच पुढील कामे करावी असा स्थानिक नागरिकांनी निर्धार केलेला आहे.
या जलवाहिनीच्या कामात चांगल्या रस्त्याचे रूप बदलाविण्यात येत आहे अनेकांच्या शेताचे कुंपण ही तोडण्यात आले आहे. ही जलवाहिनी बोरधरण ते सेलू येथील विकासचौकापर्यंत नव्याने बांधण्यात आलेल्या महामार्गाच्या बाजूने येत आहे.